शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
4
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
5
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
6
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
7
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
8
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
9
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
10
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
11
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
12
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
13
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
14
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
15
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
16
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
17
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
18
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
20
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

खुर्चीलाच प्राधान्य

By admin | Updated: January 4, 2015 02:29 IST

अडीच वर्षांत एलिनांची एकही मागणी मान्य नाही

पणजी : एलिना साल्ढाणा एकमेव महिला मंत्री असल्या, तरी त्यांच्याकडून अडीच वर्षांत केलेल्या एकूण महत्त्वाच्या मागण्यांपैकी एकही मागणी सरकारने मान्य केलेली नाही. तरीही त्यांनी एकदाही आक्रमक भूमिका घेतली नाही. साल्ढाणा या ठाम भूमिका घेत नसल्याची कल्पना गोवाज मूव्हमेंट फॉर स्पेशल स्टेटस या संघटनेच्या काही सदस्यांनाही आली आहे. आपण प्रसंगी राजीनामा देऊ, अशी भाषा सभांमध्ये साल्ढाणा यांनी यापूर्वी करून टाळ््याही मिळविल्या आहेत. गोव्याला खास दर्जा मिळवून देण्याच्या साल्ढाणा यांच्या मागणीबाबत गोवा सरकार गंभीर नाही. खास दर्जा मिळणे शक्य नाही, असे गोवा सरकारला वाटते व त्याच सरकारमध्ये साल्ढाणा वनमंत्री आहेत. साल्ढाणा यांनी दाबोळी येथून नौदलाचा तळ अन्यत्र हटवावा, अशी मागणी यापूर्वी केली; पण अशा प्रकारची मागणी ही मान्य करता येणार नाही, ती अराष्ट्रीय आहे, असे उत्तर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी यापूर्वी जाहीरपणे दिले. गोव्याला दोन विमानतळ नको, असे मंत्री साल्ढाणा जाहीरपणे म्हणतात; पण त्यांचे सरकार मोपा विमानतळाबाबत ठाम आहे. गोव्यातील अभयारण्यांना प्रत्येकी तीन किलोमीटरचा बफर झोन असावा, अशा प्रकारची मागणीही साल्ढाणा यांनी केली होती; पण राज्य सरकारने एक किलोमीटरचा बफर झोन असावा असा निर्णय घेतला. त्याविरुद्ध साल्ढाणा यांनी नंतर काही केले नाही. एकंदरीत साल्ढाणा या आपण स्वर्गीय माथानी यांचा वारसा पुढे नेत असल्याचे सांगत प्रत्यक्षात सरकारमध्येच सुरक्षित राहण्याचा मार्ग पत्करतात. (खास प्रतिनिधी)