शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

कर्जासाठी वेदश्रीवर वाढत होता दबाव

By admin | Updated: July 22, 2014 07:30 IST

मडगाव : पती व सासू-सासऱ्याच्या जाचाला कंटाळून आपल्या मुलीसह आत्महत्या करणाऱ्या वेदश्री परबची मागची चार वर्षे सतावणूक चालू होती, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.

मडगाव : पती व सासू-सासऱ्याच्या जाचाला कंटाळून आपल्या मुलीसह आत्महत्या करणाऱ्या वेदश्री परबची मागची चार वर्षे सतावणूक चालू होती, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. एका बाजूने घर बांधण्यासाठी तिने ५ लाखांचे कर्ज काढावे यासाठी, तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिने आपली नोकरी सोडावी यासाठीही तिच्यावर दबाव येत होता, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. या प्रकरणात वेदश्रीचे पती योगेश परब, पोलीस उपनिरीक्षक असलेले सासरे आत्माराम परब व सासू अमिता परब यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून, दक्षिण गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश वंदना तेंडुलकर यांच्यासमोर या अर्जावर मंगळवारी युक्तिवाद होणार आहे. या तिन्ही संशयितांना जामीन देण्यात येऊ नये, अशी मागणी मडगाव पोलिसांनी लेखी निवेदनाद्वारे न्यायालयाकडे केली आहे. मागच्या मंगळवारी वेदश्रीने आपली चार वर्षांची मुलगी यशवी हिच्यासह जुआरी नदीत उडी टाकून आत्महत्या केली होती. या प्रकरणात तिचा पती व सासू-सासऱ्याविरुद्ध मडगाव पोलिसांनी तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कलम ३०६, तर छळ केल्याच्या कलम ४९८(अ) खाली गुन्हे नोंद केले आहेत. आतापर्यंत या प्रकरणात १७ जणांच्या जबान्या नोंद केल्याची माहिती मडगावचे पोलीस निरीक्षक सुदेश नाईक यांनी दिली. वेदश्रीचे वडील यशवंत गावस यांच्या तक्रारीप्रमाणे, तिला मुलगी झाल्यानंतर तिचा सासूरवास सुरू झाला होता. पणजीहूून कामावरून परतल्यावर घरात तिच्याकडून घरकाम करून घेतले जायचे. या जाचामुळेच ती कंटाळली होती. मिळालेल्या माहितीप्रमाणे, परब यांनी घर बांधायचे काम हाती घेतले असून, या घरासाठी वेदश्रीने यापूर्वी तीन लाखांचे कर्ज काढले होते. तिने आणखी पाच लाखांचे कर्ज काढावे यासाठी तिच्यावर दबाव येत होता. पोलिसांकडून न्यायालयात जे निवेदन सादर करण्यात आले आहे, त्यात या घटनेनंतर तिन्ही संशयितांना अटक करण्यासाठी पोलीस पथक त्यांच्या घरी गेले असता त्यांचे घर बंद असल्याचे आढळले. या घटनेनंतर तिन्ही संशयित भूमिगत झाल्याचे या निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)