शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

‘होम स्विट होम’ चित्रपटाचा प्रीमियर

By admin | Updated: December 27, 2014 01:10 IST

पणजी : ‘होम स्विट होम’ या चित्रपटाची संकल्पना उत्कृष्ट असून प्रत्येक गोमंतकीयांनी हा चित्रपट पाहावा असाच आहे. गेल्या दोन वर्षांत गोव्यात घरे विकणे, न्यायासाठी लढणे ही प्रकरणे सुरू आहेत.

पणजी : ‘होम स्विट होम’ या चित्रपटाची संकल्पना उत्कृष्ट असून प्रत्येक गोमंतकीयांनी हा चित्रपट पाहावा असाच आहे. गेल्या दोन वर्षांत गोव्यात घरे विकणे, न्यायासाठी लढणे ही प्रकरणे सुरू आहेत. ज्यांना आपले क्रियाकर्म गोव्याच्या मातीत व्हावे असे वाटते, येथील भाषा, संस्कृती, पेहराव कायम राहावे असे वाटते, तोच माझ्या दृष्टीने खरा गोमंतकीय आहे. गोमंतकीय सुज्ञ आहेत. चित्रपटात मांडण्यात आलेल्या समस्या गोमंतकीयांच्या मर्माला हात घालणाऱ्या आहेत. मात्र, या समस्यांतून कशा प्रकारे मार्ग काढावा याचे ज्ञान गोमंतकीयांना आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले. गो गोवा गॉलीवुड प्रॉडक्शनचा कोकणी चित्रपट ‘होम स्विट होम’चा प्रमियर शो शुक्रवारी आयनॉक्स थिएटरात झाला. या वेळी पर्रीकर उपस्थित होते. सोबत गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष दामू नाईक, भाजपचे पणजी मतदारसंघासाठीचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर, चित्रपटाचे दिग्दर्शक स्वप्नील शेटकार, माधव गाड, संगीत दिग्दर्शक, गायक, कलाकार उपस्थित होते. पत्रकार परिषदेत चित्रपटाबाबत माहिती देताना दिग्दर्शक स्वप्नील शेटकर म्हणाले, गोमंतकीय आणि परप्रांतीय यांच्यामधील संघर्ष या चित्रपटात चित्रित करण्यात आला आहे. प्ररप्रांतीयांना ‘घाटी’ ही उपमा देत गोमंतकीय सुशेगाद राहिले आणि आता प्ररप्रांतीयांनीच गोमंतकावर कब्जा करण्यास सुरुवात केली आहे. सर्वसाधरण नागरिकांना पोलीस खाते, सरकारी कार्यालयात कशा प्रकारची वागणूक दिली जाते, याचे चित्रणही दाखविण्यात आले असल्याचे शेटकर यांनी सांगितले. राजदीप नायक म्हणाले, परप्रांतीयांच्या हातात गोवा जाण्याचे कारण गोमंतकीयच आहेत, याची जाणीव चित्रपट पाहिल्यावर होते. गोमंतकीयांनी आता जागे होण्याची आवश्यकता आहे. चित्रपट समस्या तर मांडतोच; शिवाय भविष्यात गोमंकीयांवर काय परिस्थिती ओढावेल, याचा इशाराही देतो. पहिल्याच दिवशी पहिलाच शो गोव्यातील सातही चित्रपटगृहांत हाउसफुल्ल ठरला. चित्रपटाचा पुढील भागही प्रदर्शित करण्यात येईल, अशी माहिती शेटकर यांनी दिली. राज्य सरकारच्या मदतीमुळे चित्रपटासाठी चित्रपट कर माफ करण्यात आला; पण तांत्रिक बाजू हाताळताना चांगले चित्रपट प्रेक्षकांना द्यायचे असतील, तर राज्यात व्यावसायिक चित्रपट उद्योग स्थापन होण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. या वेळी ध्वनीसंकलक शंकर सिंग, कॉद्रोस ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक कॉद्रोस, सहदिग्दर्शक माधव गाड, कलाकार राजदीप नायक, सतीश गावस, आर्यन खेडेकर उपस्थित होते. पुढील आठ दिवस हा चित्रपट साखळी, वास्को, माशेल, पणजी, मडगाव, पेडणे, केपे येथे दाखविण्यात येणार आहे.