शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी संस्थांच्या चेअरमनांची पदे जाणार

By admin | Updated: August 26, 2014 01:17 IST

पणजी : राज्यातील सहकारी संस्थांच्या अध्यक्षपदी किंवा उपाध्यक्षपदी दहा वर्षांपेक्षा जास्त काळ कुठच्याच एका व्यक्तीला राहता येणार नाही

पणजी : राज्यातील सहकारी संस्थांच्या अध्यक्षपदी किंवा उपाध्यक्षपदी दहा वर्षांपेक्षा जास्त काळ कुठच्याच एका व्यक्तीला राहता येणार नाही. विधानसभेने नुकत्याच संमत केलेल्या नव्या सहकारी संस्था कायद्यात तशी तरतूद आहे. त्यामुळे अनेक अध्यक्ष व उपाध्यक्षांना राजीनामा द्यावा लागणार आहे. प्रथमच राज्यातील सहकारी संस्थांमध्ये महिला, ओबीसी आणि अनुसूचित जमातींसाठी(एसटी) आरक्षण लागू करण्यात आले आहे. नवे सहकारी संस्था विधेयक संमत झाल्यामुळे आता या कायद्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. विधेयकास राज्यपालांची मान्यता मिळाल्यानंतर अधिसूचना जारी होणार आहे. त्यानंतर जे दहा वर्षे सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी व उपाध्यक्षपदी राहिले आहेत, त्यांना पद सोडावे लागणार आहे. सहकारी संस्थांवर निवडून येणाऱ्या मंडळांचा कालावधी हा पाच वर्षांचा असतो. एकूण दोन टर्म कुणीही अध्यक्ष किंवा उपाध्यक्षपदी राहू शकेल; पण त्याहून जास्त काळ राहता येणार नाही. सध्या राज्यात अनेक सहकारी संस्थांवर दहा वर्षांपेक्षा जास्त काळ चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव अशी पदे भोगलेले राजकारणी आहेत. काहीजण तर पंधरा ते अठरा वर्षे चेअरमन किंवा व्हाईस-चेअरमन आहेत. काहीजण संस्था स्थापन केल्यापासून आजपर्यंत संस्थेच्या चेअरमनपदी आहेत. या सर्वांना आता पदे सोडावी लागणार आहेत. त्यांना केवळ संचालकपदी राहावे लागेल. सहकारी संस्था कायद्यातील नव्या तरतुदींचा काही आमदारांनाही फटका बसणार आहे. राज्यातील अनेक सहकारी संस्था काही आमदारांच्या ताब्यात आहेत. विधेयक संमत झाल्यापासून यापुढील दहा वर्षांचा काळ विचारात घेतला जाईल की, यापूर्वीचा काळही विचारात घेऊन दहा वर्षे मोजली जातील, याबाबत काहीजणांमध्ये संभ्रम आहे. दरम्यान, गोवा राज्य सहकारी बँकेचा बहुराज्यीय बँक दर्जा काढून घेऊन ही बँक गोव्यापुरतीच मर्यादित करावी, या दृष्टीने शासकीय पातळीवरून विचार सुरू झाला आहे. दमण व दिवमध्ये राज्य सहकारी बँकेच्या शाखा आहेत. त्या शाखांची मिळून स्वतंत्र सहकारी संस्था स्थापन करून राज्य सहकारी बँक पूर्णपणे गोव्यापुरतीच मर्यादित करावी, असा विचार आहे. सहकारमंत्री ढवळीकर यांनी या वृत्तास दुजोरा दिला. (खास प्रतिनिधी)