शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

रायबंदर अपघातात पोलीस शिपाई ठार

By admin | Updated: July 7, 2015 01:56 IST

तिसवाडी : रायबंदर-पणजी मर्गावर प्रवासी बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मडकई येथील दुचाकीचालक ठार झाला. हा अपघात सोमवारी सकाळी ८.३५

तिसवाडी : रायबंदर-पणजी मर्गावर प्रवासी बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मडकई येथील दुचाकीचालक ठार झाला. हा अपघात सोमवारी सकाळी ८.३५ वाजता घडला. मृताचे नाव निर्जय महादेव गावडे (वय २२) असे असून तो गोवा पोलीस दलात ‘आयआरबी’ विभागात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होता.जुने-गोवे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्जय आपल्या मोटारसायकलवरून (क्र. जीए ०७ एच ४४६१) पणजीकडे जात असता तो स्वत: तोल जाऊन पडला व त्याच्या डोक्याला जबर मार बसल्याने तो गतप्राण झाला. हा अपघात प्रत्यक्ष पाहिलेल्या प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, हा युवक एका प्रवासी बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात होता; पण बस रस्त्यावर किंचित उजव्या बाजूला आल्याने मोटारसायकलला सौम्य धक्का बसला व विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला त्याने जोरदार धडक दिली. डोक्यात हेल्मेट नसल्याने त्याचे डोके रस्त्यावर आदळून तो गतप्राण झाला.ज्या बसला धक्का बसला, ती न थांबता सुसाट पणजीच्या दिशेने गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेची खबर देऊनही १०८ वाहन घटनास्थळी पोहोचण्यासाठी अर्धा तास लागला, तर पोलिस एका तासानंतर पोहोचले. काही महिन्यांपूर्वी याच मार्गावर वाळपईयेथील एका तरुण कॉन्स्टेबलचा असाच दुचाकी अपघातात मृत्यू झाला होता.सध्या जुने गोवे ते पणजी या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम चालू असल्याने ९० टक्के वाहने जुने गोवे-रायबंदरच्या जुन्या व अरुंद मार्गावरून जात असल्याने या मार्गावर प्रचंड प्रमाणात रहदारी असते. वाहतुकीला शिस्त लावण्यात पोलीस कमी पडत असल्याने आणखी अपघात होण्याची शक्यता आहे. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक दोन तास खोळंबून राहिल्याने प्रवाशांना मनस्ताप सोसावा लागला. (प्रतिनिधी)