शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

पे-पार्किंगप्रश्नी भाजप नगरसेवकांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2016 02:31 IST

पणजी : पणजी शहरातील अठरा रस्त्यांच्या बाजूने अतिशय जास्त शुल्क आकारून पे-पार्किंग लागू केले जाऊ नये, अशी मागणी

पणजी : पणजी शहरातील अठरा रस्त्यांच्या बाजूने अतिशय जास्त शुल्क आकारून पे-पार्किंग लागू केले जाऊ नये, अशी मागणी महापालिकेतील भाजप नगरसेवकांच्या गटाने केली आहे. प्रचंड शुल्काच्या पे-पार्किंग प्रस्तावाबाबत महापौर सुरेंद्र फुर्र्तादो हे ठाम राहिले तर येत्या २८ रोजी महापालिकेवर मोर्चा नेला जाईल, असा इशारा भाजपचे नगरसेवक मिनीन डिक्रुज, शेखर डेगवेकर आणि रूपेश हळर्णकर यांनी दिला आहे. तिन्ही नगरसेवकांनी शुक्रवारी भाजपच्या येथील कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. पणजीतील लोकांची दुचाकी व चारचाकी वाहने वारंवार पणजीत कामानिमित्त फिरतात. शिवाय अनेक सरकारी व खासगी आस्थापनांतील कर्मचारी पणजीत येतात. या लोकांना पे-पार्किंगसाठी खूप पैसे खर्च करावे लागतील. ही शुल्कवाढ त्वरित मागे घेतली जावी, अशी मागणी मिनिन डिक्रुज व इतरांनी केली. महापौरांनी स्वत:च कुणाशीही चर्चा न करता हा प्रस्ताव एकतर्फी पद्धतीने आणला आहे. एका पराभूत नगरसेवकाला पे-पार्किंगचे कंत्राट देण्यासाठी घाट घातला जात आहे, आम्ही या प्रस्तावास सर्व शक्तीने विरोध करू, असे डिक्रुज यांनी सांगितले. भाजप समर्थक नगरसेवकांची महापालिकेत सत्ता होती, तेव्हा एकूण अठरा रस्त्यांसाठी जे शुल्क लागू केले होते ते सर्वांना परवडण्यासारखे होते. मात्र, त्याबाबतचे कंत्राट रद्द करून आता नवी शुल्कवाढ सुचविली गेली आहे. महापौरांनी महापालिकेच्या अस्थायी समितीच्या बैठकीत नुकताच हा प्रस्ताव मंजूर करून घेतला. त्या वेळी समितीच्या सदस्यांपैकी फक्त शुभम चोडणकर व वैदेही नायक यांनी त्यास विरोध केला. त्या वेळी महापौर संतापले. उदय मडकईकर, लता पारेख, अस्मिता केरकर आदींनी विरोध केला नाही. येत्या २८ रोजी महापालिका मंडळाची बैठक होणार आहे. त्या वेळी या नव्या शुल्कवाढीस विरोध करूच. शिवाय महापौरांनी प्रस्ताव मागे घेतला नाही तर लोकांना घेऊन आम्ही महापौरांवर मोर्चा नेऊ, असे डिक्रुज म्हणाले. (खास प्रतिनिधी)