शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकखाली सापडून पादचाऱ्याचा मृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2015 02:03 IST

वास्को : गुरुवारी सकाळी एलमोंत थिएटरनजीक झालेल्या एका अपघातात एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला़ मुरगाव

वास्को : गुरुवारी सकाळी एलमोंत थिएटरनजीक झालेल्या एका अपघातात एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला़मुरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात गुरुवारी सकाळी ११़३० वाजण्याच्या सुमारास घडला़ त्या वेळी अभय प्रभु यांच्या मालकीचा ट्रक क्र. जीए - ०५/टी - १२८९ हा सडा येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून तांदळाच्या गोणी घेऊन फ ोंडा येथील नागरी पुरवठा खात्याच्या गोदामात जात होता़ त्या वेळी एलमोंत थिएटर जवळ रस्त्यावरून जात असलेल्या एका अज्ञात इसमास धडक लागली़ या धडकेत तो खाली कोसळला आणि ट्रकचे पुढील चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा झाला आणि त्याचे जागीच निधन झाले़ त्याचा चेहऱ्याचा पूर्णपणे चेंदामेंदा झाल्याने तसेच कपड्यात कोणत्याच प्रकारचे ओळखपत्र न मिळाल्याने त्याची ओळख पटू शकली नाही; पण त्याच्या पेहरावावरून तो एक मजूर असावा, असा पोलिसांचा तर्क आहे़ मुरगाव पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच मुरगाव पोलीस स्थानकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक कोरगावकर हे घटनास्थळी हजर झाले आणि अपघाताचा पंचनामा करून मृत्तदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगावच्या हॉस्पिसिओत पाठवून दिला. या अपघात प्रकरणी मुरगाव पोलिसांनी ट्रकचालक समोल कुमार याच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे़दिस्तेरो रेल्वे व पूल ते सडा जंक्शन या रस्त्यावर अवजड वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात होत असल्याने रस्त्यावर नेहमी अपघात होत असतात़ त्यामुळे हा रस्ता अपघातग्रस्त रस्ता म्हणून मानला जात आहे़ या रस्त्यावर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे़ सडा भागात भारतीय अन्न महामंडळाची गोदामे असल्याने या रस्त्यावरून नेहमी रेल्वेमधून आलेले धान्य बायणा येथील रेल्वे यार्डातून सडा गोदामात आणले जाते आणि त्यानंतर गोवा सरकारच्या नागरी पुरवठा खाते खरेदी करून आपल्या कुठ्ठाळी येथील गोदामात ठेवण्यात येते़ त्यामुळे या रस्त्यावरून धान्य भरलेल्या ट्रकांची नेहमी ने-आण करणारी वाहतूक चालूच असते़ तसेच सडा भागात राहणाऱ्या नागरिकांची संख्याही जास्त असल्याने त्यांची दुचाकी व चारचाकी वाहनांची रहदारीही मोठ्या प्रमाणात होत असते़ हा रस्ता अरुंद असल्याने व वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने दिस्तेरो पूल ते सडा हा मार्ग अपघातग्रस्त रस्ता मानला जातो़ दिस्तेरो-सडा या मार्गावरील वाहनांची रहदारी पाहून मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांनी यापूर्वीच या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतलेले असून कामाला प्रारंभही झालेला आहे़ येत्या वर्षभरात या रस्त्याचे काम पूर्ण झालेले आहे़ तसेच भारतीय महामार्ग प्राधिकरणाने स्थगित झालेल्या वरुणापुरी ते मुरगाव बंदर पर्यंतच्या चौपदारी महामार्गाचे काम हाती घेतल्याने भविष्यकाळात या मार्गावरील अवजड वाहनांची रहदारी बंद होईल आणि त्यामुळे अपघात होण्याचेही टळणार आहे़ (प्रतिनिधी)ू