शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

पार्सेकर-सुदिन राजकारणात अडली ‘जुवारी’ची पायाभरणी

By admin | Updated: December 9, 2015 02:11 IST

पणजी : सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिल्लीस जाऊन १४ डिसेंबर ही तारीख जुवारीवरील नव्या

पणजी : सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिल्लीस जाऊन १४ डिसेंबर ही तारीख जुवारीवरील नव्या पुलाच्या पायाभरणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून मान्य करून आणली होती; पण एवढ्या घाईत पायाभरणी शक्य नाही, अशी भूमिका घेत मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी ही तारीख मान्य केली नाही. त्यामुळे आता दि. १४ व १९ डिसेंबर या दोन्ही तारखांना जुवारीवरील सहा पदरी पुलाची पायाभरणी होऊ शकणार नाही, हे स्पष्ट झाले. मंत्री ढवळीकर यांचे गडकरी यांच्याशी असलेले जवळचे संबंध हा भाजपमध्ये नेहमीच चर्चेचा विषय बनला आहे. काही मंत्र्यांना हे जवळचे संबंध आवडत नाहीत. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासोबत गेल्या आठवड्यात मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिल्लीत गडकरी यांच्यासोबत बैठक घेतली. येत्या १३ रोजी गडकरी हे पर्रीकर यांच्या सत्कारासाठी गोव्यात येत आहेत. त्याचवेळी सुमारे पाच हजार कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी केली जावी, अशी विनंती ढवळीकर यांनी गडकरी यांना केली व त्यांनी ती मान्य केली. त्यांनी आपल्या डायरीवर तारीख लिहूनही घेतली. मंत्री ढवळीकर यांनी एका इंग्रजी दैनिकाकडे बोलताना १४ डिसेंबरला जुवारीची पायाभरणी होईल, असे दिल्लीहूनच जाहीरही केले; पण गोव्यात आल्यानंतर त्यांना धक्कादायक अनुभव आला. मुख्यमंत्री पार्सेकर यांची ढवळीकर यांच्याशी जुवारी पुलाच्या पायाभरणीविषयी चर्चा झाली, तेव्हा येत्या १४ रोजी घाईघाईत पायाभरणी करणे शक्य होणार नाही, असे पार्सेकर यांनी स्पष्ट केले. १३ रोजी पर्रीकरांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त आम्ही व्यस्त असल्याने पुन्हा १४ रोजी जुवारीसह काणकोण बायपास, मडगाव बायपास व अन्य प्रकल्पांच्या पायाभरणीची तयारी करणे कठीण होईल, अशी सरकारची भूमिका आहे. मंत्री ढवळीकर यांच्यापूर्वी मुख्यमंत्री पार्सेकर स्वत: दिल्लीस गेले होते. त्यांनी गडकरी यांना १९ डिसेंबर रोजी जुवारीच्या पायाभरणीसाठी या, अशी विनंती केली होती. गडकरी यांनी तिही विनंती मान्य करून डायरीवर लिहून ठेवले होते; पण नंतर त्यांचा कार्यक्रम अचानक कसा काय बदलला ते मुख्यमंत्र्यांनाही कळू शकले नाही. जुवारी पुलासह गोव्याच्या बांधकाम क्षेत्रात पाच हजार कोटींचे प्रकल्प केंद्राच्या मदतीने उभे राहणार असून त्याचे श्रेय कुणी घ्यावे यावरून भाजप व म.गो. पक्षात छुप्या पद्धतीने रस्सीखेच सुरू आहे. (खास प्रतिनिधी)