शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

छाननी समितीचे प्रमुखपद पार्सेकरांनी नाकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 01:59 IST

सद्गुरू पाटील ल्ल पणजी प्रादेशिक आराखडा हा नाजूक व वादाचा विषय असल्याने उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी आराखड्याशी संबंधित छाननी

सद्गुरू पाटील ल्ल पणजी प्रादेशिक आराखडा हा नाजूक व वादाचा विषय असल्याने उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी आराखड्याशी संबंधित छाननी समितीवर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची नियुक्ती करणारा प्रस्ताव तयार केला होता; पण मुख्यमंत्र्यांकडे ही फाईल पोहोचली, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावात बदल करत समितीचे प्रमुखपद स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे आता समितीचे अध्यक्षपद उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांना स्वीकारावे लागले असून सगळी जबाबदारी डिसोझा यांच्यावर आली आहे. उपमुख्यमंत्री डिसोझा हे नगरनियोजन खात्याचे मंत्री आहेत. प्रादेशिक आराखडा कसा असतो, या आराखड्याशी गोव्यातील कोणते बिल्डर कसे संबंधित आहेत व एकूणच या आराखड्यात कोणते बदल कसे करायला हवेत, हे डिसोझा यांना ठाऊक आहे. मुख्यमंत्री पार्सेकर यांनी या विषयात जास्त लक्ष घातलेले नाही. तथापि, प्रादेशिक आराखडा हा गेली नऊ वर्षे सतत वादाचा विषय ठरत आला आहे. आराखड्यासाठी सुमारे सहा हजार सूचना सरकारकडे आलेल्या आहेत. तत्पूर्वीच्या साडेतीन हजार सूचना प्रलंबित आहेत. म्हणजेच एकूण साडेनऊ हजार सूचना व आक्षेपांवर छाननी समितीला निर्णय घ्यायचा आहे. अशा समितीचे अध्यक्षपद मुख्यमंत्री पार्सेकर यांच्याकडे सोपवावे व आपण उपाध्यक्ष किंवा एक सदस्य या नात्याने समितीवर राहावे, असे डिसोझा यांनी ठरविले होते. समिती कशी असावी व त्यावर कोण असावेत याबाबतचा सदस्यांच्या नावासह प्रस्ताव उपमुख्यमंत्री डिसोझा यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता. मुख्यमंत्र्यांनी प्रारंभी त्याविषयी कोणताच निर्णय घेतला नाही. ‘प्लीज स्पिक’ असेही एकदा फाईलवर लिहिले. छाननी समिती अजून निश्चित होत नसल्याने उपमुख्यमंत्री डिसोझा थोडे अस्वस्थ झाले होते. तथापि, पार्सेकर यांनी शुक्रवारी हा विषय निकालात काढला.