शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

माडाची चूक सुधारण्याचे पर्रीकरांचे आश्वासन; सरदेसाई समाधानी

By admin | Updated: March 15, 2017 01:33 IST

पणजी : माडाला भाजप सरकारने गवताचा दर्जा दिला आहे, अशी टीका गोवा फॉरवर्ड पक्षाने यापूर्वी लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नेतृत्वाखालील

पणजी : माडाला भाजप सरकारने गवताचा दर्जा दिला आहे, अशी टीका गोवा फॉरवर्ड पक्षाने यापूर्वी लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नेतृत्वाखालील सरकार अधिकारावर असताना केली होती. नवे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्या कथित चुकीबाबत सुधारणा करण्याचे आश्वासन मंगळवारी जाहीरपणे दिले. मंत्री विजय सरदेसाई यांनी याबाबत समाधान व्यक्त केले व यापुढील काळात जेव्हा विधानसभेचे पहिले अधिवेशन होईल तेव्हा ती चूक सुधारली जाईल, असे सरदेसाई यांनी सांगितले.राजभवनवर झालेल्या शपथविधी सोहळ्यानंतर पत्रकारांनी पर्रीकर यांना माडाच्या वादाविषयी प्रश्न विचारला. माडाला गवताचा दर्जा दिला, अशी टीका करून गोवा फॉरवर्डने रान उठविले होते. त्याविषयी बोलताना पर्रीकर म्हणाले, की ती गोष्ट खूप लहान आहे. तथापि, आम्ही त्यात सुधारणा करू व समाधानकारक अशी सुधारणा करू. विश्वासदर्शक ठराव मांडून होऊ द्या, नंतरच्या पहिल्या विधानसभेच्या अधिवेशनात आम्ही माडाबाबत कायदेशीर तरतुदीमध्ये सुधारणा करू.नंतर पत्रकारांशी बोलताना सरदेसाई यांनी समाधान व्यक्त केले. सरदेसाई म्हणाले, की आम्ही गोंयकारवादी सरकार चालवू. गोवा फॉरवर्डने निवडणूक जाहीरनाम्यातून दिलेली सगळी आश्वासने पाळली जातील. आपण पर्रीकर यांना पाठिंब्याचा शब्द दिला होता व त्यामुळेच संरक्षणमंत्रिपद सोडून पर्रीकर गोव्यात मुख्यमंत्री म्हणून आले. मी शब्द पाळीन. मी काँग्रेससोबत जाणार नाही; कारण काँग्रेसने निवडणुकीवेळी पाठीत सुरा खुपसला. आमच्याशी निवडणूकपूर्व युती केली नाहीच. शिवाय नंतरही आमच्या विरोधातील उमेदवारांना बी-फॉर्म दिला. आताही काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदाचे दावेदार खूप आहेत. (खास प्रतिनिधी)