शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

पंचायत निवडणूक लांबणीवर?

By admin | Updated: April 14, 2017 02:46 IST

सद्गुरू पाटील ल्ल पणजीराज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या दि. २१ मेपर्यंत घेणे गरजेचे असले, तरी सरकार निवडणुका वेळेत घेऊ शकणार नाही,

सद्गुरू पाटील ल्ल पणजीराज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या दि. २१ मेपर्यंत घेणे गरजेचे असले, तरी सरकार निवडणुका वेळेत घेऊ शकणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासकीय पातळीवरील शेकडो अधिकारी व कर्मचारी सध्या रजेवर आहेत. त्यामुळे कामे होत नसल्याने सरकार हतबल बनले आहे. पंचायत निवडणुका लांबणीवर टाकण्याचा विचार या हतबलतेमधून पुढे आल्याची माहिती मिळाली.पंचायत निवडणुका काही पक्षीय पातळीवर होत नाहीत; मात्र प्रत्येक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि प्रत्येक मंत्री, आमदाराचे समर्थक उत्साहाने निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. काही पंचायत क्षेत्रांमध्ये मंत्री व आमदारही आपल्या कार्यकर्त्यांना रिंगणात उतरवून स्वत: त्या निवडणुकीत रस घेतात. यातून कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होतो व कटुता येते. काँग्रेसपेक्षाही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जास्त संख्येने पंचायत निवडणुकीमध्ये भाग घेतात. अधिकाधिक पंचायती स्वत:च्यात ताब्यात राहायला हव्यात, असा सत्ताधारी पक्षाचा प्रयत्न असतो.या वेळी गोवा फॉरवर्ड, मगोप आणि काही अपक्ष यांच्या सहभागाने भाजपला आघाडी सरकार बनवावे लागले आहे. अनेक मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार, मंत्री व अन्य उमेदवार पराभूत झालेले आहेत. पराभवाच्या सगळ्या आठवणी कार्यकर्त्यांमध्ये आणि लोकांमध्येही ताज्या असतानाच पंचायत निवडणुकीस सामोरे जाण्याची गरज नाही, अशी भावना भाजपच्या आतील गोटात आहे. त्यामुळेही सरकार सध्या पंचायत निवडणुकीस सामोरे जाण्यात जास्त उत्साह दाखवत नाही. पंचायत संचालक गुरुदास पिळर्णकर यांची अचानक बदली करून सरकारने ते दाखवूनही दिले आहे.प्रभाग फेररचना न करता पूर्वीच्याच प्रभागांनुसार व पूर्वीच्याच आरक्षणानुसार निवडणुका घ्याव्यात, असेही सरकारला प्रारंभी वाटत होते; पण ही कल्पना मुख्य सचिवांना आवडली नाही, असे सूत्रांकडून कळते.दरम्यान, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी गुरुवारी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पंचायत निवडणुका लांबणीवर टाकाव्यात की वेळेत घ्याव्यात, याबाबतचा निर्णय येत्या तीन दिवसांत होईल.