शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पणजीचे ‘वीजग्रहण’ सुटणार

By admin | Updated: July 8, 2015 01:42 IST

पणजी : थिवी-कदंब पठार-फोंडा अशी ४५ किलोमीटरची ११0 केव्ही वीजवाहिनी पूर्णपणे बदलण्यात येणार असून पुढील काही दिवसांत प्रत्यक्ष काम सुरू

पणजी : थिवी-कदंब पठार-फोंडा अशी ४५ किलोमीटरची ११0 केव्ही वीजवाहिनी पूर्णपणे बदलण्यात येणार असून पुढील काही दिवसांत प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर राजधानीवासियांना खंडित वीजपुरवठ्याचा मनस्ताप भोगावा लागू शकतो. एकदा ही वीजवाहिनी बदलल्यानंतर मात्र पणजीतील वीज समस्या कायमस्वरूपी सुटेल, असा दावा अधिकारी करत आहेत.६0 कोटी रुपये खर्चाच्या या कामाचे कंत्राट पुणे येथील स्टरलाईट कंपनीला देण्यात आले आहे. प्रत्यक्ष काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती खात्याचे जनसंपर्क अधिकारी कार्यकारी अभियंता टी. ए. वर्गिस यांनी दिली.राजधानीत वीज समस्या इतकी बिकट आहे की, साधा जंपर तुटला तरी वीज गायब होऊन दुरुस्तीकामाला अर्धा दिवस लागतो. त्यामुळे शहरातील व्यावसायिकांचे नुकसान तर होतेच; शिवाय कार्यालयीन कामकाजही खोळंबते. कंडक्टर्स निकामी होत असल्याने वरचेवर बदलावे लागतात. राजधानीतील वीजपुरवठा या ११0 केव्ही वाहिनीवर अवलंबून आहे. ही संपूर्ण वीजवाहिनीच बदलली जाणार असल्याने या कामासाठी म्हणून ‘शट डाउन’ घ्यावे लागतील. अर्थात खंडित वीजपुरवठ्याबद्दल पूर्वसूचना देण्यात येईल.वीज बिले घरबसल्या आॅनलाईन भरण्यासाठी ‘ई-पेमेंट’ व्यवस्था करण्यात आली खरी; परंतु त्याचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांची संख्या अगदीच कमी आहे. तिसवाडी तालुक्यात ८0 हजार वीज ग्राहक आहेत; परंतु त्यातील केवळ १२00 जणच या योजनेचा लाभ घेतात. हे प्रमाण १.५ टक्के इतके अत्यल्प आहे. बिले तयार करण्याचे काम गोवा इलेक्ट्रॉनिक लिमिटेडकडे सोपविल्यापासून ग्राहकांना दर महिन्याला वेळेत बिले मिळू लागली आहेत. त्यामुळे आता बिलांसाठी विलंब होत असल्याच्या तक्रारीही येत नाहीत, असे वर्गिस यांनी सांगितले. (प्रतिनिधी)