शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

पणजीत आज मतदारराज

By admin | Updated: February 13, 2015 01:14 IST

पणजी : गेली वीस वर्षे पणजी मतदारसंघावर राज्य करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आता पुन्हा एकदा पणजीवासीय कौल देतात की नाही,

पणजी : गेली वीस वर्षे पणजी मतदारसंघावर राज्य करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आता पुन्हा एकदा पणजीवासीय कौल देतात की नाही, हे शुक्रवारी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या मतदान प्रक्रियेतून ठरणार आहे. भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर, विरोधी काँग्रेसचे उमेदवार सुरेंद्र फुर्तादो यांच्यासह अपक्ष उमेदवार समीर केळेकर यांनीही विजयाचा दावा केला आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता पणजी मतदारसंघातील ३० मतदान केंद्रांवरून मतदानाच्या प्रक्रियेस आरंभ होईल. गुरुवारी सायंकाळी पोलीस बंदोबस्तात इलेक्ट्रॉनिक यंत्रे मतदान केंद्रांवर पोहोचती करण्यात आली. पणजी मतदारसंघात एकूण २२ हजार ५७ मतदार आहेत. २०१२ साली पणजीत ७७.१३ टक्के, तर २०१४च्या लोकसभा निवडणुकीवेळी ७३.२७ टक्के मतदान झाले होते. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गेल्या वर्षाच्या अखेरीस आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे पणजीत पोटनिवडणूक होत आहे. एकूण चार उमेदवार रिंगणात आहेत. त्यात भाजपचे सिद्धार्थ कुंकळ्येकर, काँग्रेसचे सुरेंद्र फुर्तादो तर समीर केळेकर व सदानंद वायंगणकर या दोन अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. कुंकळ्येकर, केळेकर व वायंगणकर हे प्रथमच विधानसभा निवडणूक लढवत आहेत. पर्रीकर यांच्या मागे भाजपचे सगळे कार्यकर्ते व समर्थक ठामपणे उभे राहायचे. त्या तुलनेत कुंकळ्येकर यांना पाठिंबा कमी आहे; पण पर्रीकर त्यांच्या मागे ठामपणे उभे असल्याने ते तुल्यबळ उमेदवार मानले जातात. काँग्रेसच्या तुलनेत पणजीत भाजपची पक्ष संघटना बळकट आहे. काँग्रेसचा गेल्या वीस वर्षांत एकदाही पणजीत विजय झाला नाही. मात्र, काँग्रेसचे उमेदवार फुर्तादो यांना अल्पसंख्याकांमध्ये बऱ्यापैकी स्थान आहे. पणजीत ६ हजार ख्रिस्ती मतदार आहेत. शिवाय मुस्लिम मतदारांची संख्या १२00 आहे. काँग्रेसनेही प्रचार कार्य बऱ्यापैकी केले आहे. भाजपचे कुंकळ्येकर यांनीही घरोघर जाऊन खूप जोरात प्रचार काम पार पडले. भाजप व काँग्रेस अशी कडवी लढत असल्याचे चित्र शेवटच्या टप्प्यात उभे राहिले आहे. पर्रीकर हे २०१२ साली साडेपाच हजार मतांची आघाडी घेऊन विजयी झाले होते. (खास प्रतिनिधी)