शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

खवय्यांसाठी पणजीत मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2017 01:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी (दि. १०) ‘खाद्य आणि सांस्कृतिक महोत्सव २०१७’चे उद्घाटन केले. या वेळी पर्यटनमंत्री

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी (दि. १०) ‘खाद्य आणि सांस्कृतिक महोत्सव २०१७’चे उद्घाटन केले. या वेळी पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर, जीटीडीसीचे अध्यक्ष नीलेश काब्राल, महापौर सुरेंद्र फुर्तादो, पर्यटन संचालक मेनिनो डिसोझा आणि इतर मान्यवर उपस्थित होते. येथील दयानंद बांदोडकर मैदानात रविवार, दि. १४ पर्यंत हा महोत्सव सुरू राहील. दरवर्षीप्रमाणे या महोत्सवात भरपूर मनोरंजन, गोव्याचे अस्सल खाद्यपदार्थ आणि पेयांचा आस्वाद घेण्याची संधी देणारे ६० स्टॉल्स सहभागी झाले आहेत. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात प्रसिद्ध राष्ट्रीय बॅँड्स कला सादर करतील. त्याचप्रमाणे गोमंतकीय कलाकारही सर्वोत्तम लोकसंगीत व लोककलेची अनुभूती देतील.या वेळी पर्रीकर म्हणाले, दरवर्षी गोवा टुरिझमतर्फे या अभिनव महोत्सवाचे खास आयोजन केले जाते. गोमंतकीय खाद्यपदार्थ आणि संस्कृतीला एकाच व्यासपीठावर आणण्याचा हेतू त्यामागे असतो. प्रचंड उत्साह आणि कलाकार, सादरकर्ते, पर्यटन क्षेत्रातील भागधारक व पर्यटकांच्या लक्षणीय सहभागाने दरवर्षी हा महोत्सव आणखी विकसित होतना पाहणे प्रोत्साहनकारक आहे. पर्यटनमंत्री आजगावकर म्हणाले, नुकत्याच ग्रेप्स एस्केपेडला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर गोवा खाद्य आणि सांस्कृतिक महोत्सव २०१७ मध्येही पर्यटक व स्थानिकांसाठी खाद्यपदार्थ, मनोरंजन व संगीताचा सुरेख मेळ घालण्यात आला आहे. पर्यटनमंत्री या नात्याने गोव्याचे विविध पैलू समोर येतील अशा प्रकारे अधिकाधिक महोत्सव व कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी मी उत्सुक आहे. जीटीडीसीचे अध्यक्ष नीलेश काब्राल म्हणाले, एकाच छताखाली गोव्याची संस्कृती आणि खाद्यपदार्थांचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी जीटीडीसीतर्फे दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आज गुरुवारी (दि. ११) आघाडीचा बॅँड ‘लेस’ संध्याकाळी सात वाजता आपल्या संगीताची अनुभूती देईल, तर रात्री ८.३० वा. गोव्यातील ‘ब्लड’ हा बॅँड रॉक संगीत सादर करेल. शुक्रवारी सायंकाळी सात वाजता ‘लॉर्ना’ आपली कला सादर करतील व त्यानंतर ‘अंतरिक्ष’ हा दिल्लीचा रॉक बॅँड आपली कला सादर करेल. शनिवारी सायंकळी ७ वाजता ‘द लॅटिन कनेक्शन’च्या संगीतावर ठेका धरता येईल. त्यानंतर मुंबईच्या ‘बॉम्बे बेसमेंट्स’चे सादरीकरण होईल. रविवारी महोत्सवाच्या सांगतासमयी गोव्यातील ‘अल्ट्राट्राझ’ आणि बंगळुरूस्थित ‘लगोरी’ अनुक्रमे सायंकाळी ८.३० वा. कला सादर करतील.