शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

घोडेस्वारीस नकार दिला म्हणून टळले संकट; काश्मीरला गेलेल्या ४ युवकांचा जीव थोडक्यात बचावला

By पंकज शेट्ये | Updated: April 24, 2025 12:51 IST

हे तरुण त्या घटनास्थळापासून अवघ्या पाच ते दहा मिनिटांच्या अंतरावर होते. तेथील वाहनचालक सुरक्षितपणे आम्हाला घेऊन आमच्या हॉटेलवर आला. त्यामुळे आम्ही वाचलो.

पंकज शेट्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : काश्मीर खोऱ्यातील पहलगाम बायसरन भागात मंगळवारी जेव्हा दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला, त्यावेळी काश्मीर फिरण्यासाठी गेलेले वास्कोतील चार तरुण त्या घटनास्थळापासून दहा मिनिटांच्या अंतरावर होते. ज्या ठिकाणी हल्ला झाला, त्या पर्यटकस्थळी घोडेस्वारीने जावे लागत असल्याने आम्ही त्याला नकार दिला. त्यानंतर दहा मिनिटांच्या अंतरावर पहलगाम बायसरन येथे गोळीबार हल्ला झाल्याची माहिती मिळाली. अनेक पर्यटक धावपळ करताना दिसून आल्याची माहिती काश्मीर फिरण्यासाठी गेलेला वास्कोतील तरुण विष्णू केरकर यांनी दिली.

वास्को येथे राहणारे विष्णू केरकर आणि त्यांचे तीन मित्र चार दिवसांपूर्वी काश्मीर फिरण्यासाठी गेले होते. मंगळवारी दुपारी काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बायसरन भागात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात बऱ्याच जणांचा मृत्यू झाला, तर बरेचजण जखमी झाले. पहलगाम बायसरन येथे जेव्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यावेळी तेथून १० ते १५ मिनिटांच्या अंतरावर वास्कोतून गेलेले विष्णू केरकर आणि त्यांचे तीन तरुण मित्र तेथील पर्यटनस्थळाचे दर्शन घेत होते. त्यावेळी तेथील काही ट्युरिस्ट गाईडने आम्हाला पहलगाम बायसरन जाणार आहात का? असे विचारले. तेथे फक्त घोडेस्वारीने जाऊ शकतात असे आम्हाला कळाल्यानंतर आम्ही त्यांना नकार दिला. आम्ही नकार दिल्याच्या पाच-दहा मिनिटांनंतर आम्हाला तेथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केल्याची माहिती मिळाली.

वाहनचालकाचे प्रसंगावधान

आमचा तेथील वाहनचालक सुरक्षितरीत्या आम्हाला घेऊन आमच्या हॉटेलवर आला. जेथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार करून हल्ला केला, ते पर्यटनस्थळ पाहायला आम्ही जाणार होतो, मात्र तेथे घोडेस्वारीनेच जावे लागत असल्याने आम्ही नकार दिला अन् देवाच्या कृपेनेच आमचा जीव बचावला, असे विष्णू केरकर म्हणाले. आमचा तेथील वाहनचालक आम्हाला सुखरूपरीत्या हॉटेलवर घेऊन आल्यानंतर आता आम्ही तेथे सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर