शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

तवडकर यांच्या प्रस्तावाला मंत्र्यांचा विरोध

By admin | Updated: November 21, 2015 02:10 IST

पणजी : भाजपचे मंत्री रमेश तवडकर यांनी साखळी शहरात विभागीय कृषी कार्यालय सुरू करण्यासाठी ३४ नवे कर्मचारी भरण्यासाठी मंजुरी मिळविण्याच्या हेतूने

पणजी : भाजपचे मंत्री रमेश तवडकर यांनी साखळी शहरात विभागीय कृषी कार्यालय सुरू करण्यासाठी ३४ नवे कर्मचारी भरण्यासाठी मंजुरी मिळविण्याच्या हेतूने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडलेला प्रस्ताव काही मंत्र्यांनी तीव्र हरकत घेऊन रोखला. राज्यात भाजप-म.गो.चे आघाडी सरकार अधिकारावर आहे. भाजपच्या कुठच्याही मंत्र्याने कसलाही प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मांडला तरी, तो मंजूर होतोच. एखाद्यावेळी चर्चेअंती प्रस्ताव फेरविचारार्थ मागे ठेवला जातो. मात्र, शुक्रवारी मंत्रिमंडळ बैठकीत वेगळे घडले. कृषीमंत्री तवडकर यांनी साखळीत नवे विभागीय कृषी कार्यालय सुरू करूया व त्यासाठी ३४ कर्मचारी नेमूया, अशी भूमिका घेतली. तसा प्रस्तावही त्यांनी बैठकीत मांडला. या वेळी एक-दोन मंत्र्यांनी मोठे आश्चर्य व्यक्त केले. डिचोली शहरात विभागीय कृषी कार्यालय आहे. डिचोली तालुक्यात केवळ तीन विधानसभा मतदारसंघ असताना व तिथे विभागीय कृषी कार्यालय असताना साखळीसाठी वेगळे विभागीय कार्यालय का म्हणून हवे, अशी विचारणा काही मंत्र्यांनी केली. सासष्टी तालुक्यात आठ व बार्देसमध्ये सात विधानसभा मतदारसंघ असतानाही त्या तालुक्यांमध्येही प्रत्येकी एक विभागीय कृषी कार्यालय आहे, मग साखळीत आणखी नवे विभागीय कार्यालय कशासाठी व त्यासाठी ३४ कर्र्मचारी का म्हणून नियुक्त करायला हवेत, अशी विचारणा काही मंत्र्यांनी केली. या वेळी मंत्री तवडकर यांनी योग्य ते स्पष्टीकरण दिले नाही. यामुळे हा प्रस्ताव मंजुरीविना मागे ठेवण्यात आला. (खास प्रतिनिधी)