हणजूण : बामणवाडो-हणजूण येथील लुईझा फर्नांडिस (७०) या वृद्धेचा अज्ञातांनी खून केला, तर तीची विधवा वहिनी टॅरसीला फर्नांडिस ही अत्यवस्थ आहे. मालमत्तेच्या वादातून लुईझा हिचा खून झाला असावा, असा संशय असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे. येथील सेंट मायकल चर्चपासून जवळ असलेल्या बामणवाडो येथे मयत लुईझा फर्नांडिस व तिची विधवा वहिनी टॅरसीला फर्नांडिस या दोघी राहातात. बुधवारी दिवसभर पाऊस सुरू होता. त्यामुळे शेजाऱ्यांना या प्रकाराची खबर लागली नाही. फर्नांडिस यांच्या एका नातेवाईकाने सायंकाळी त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्या नातेवाईकाने घरी येऊन पाहिले, तेव्हा लुईझा फर्नांडिस ही मृतावस्थेत आढळली, तर तिची वहिनी टॅरसीला ही अत्यवस्थ स्थितीत पडलेली आढळली. त्याने त्वरित हणजूण पोलिसांना कळविल्यानंतर हणजूण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक महेश केरकर यांनी घटनास्थळी जाऊन टॅरसीला हिला गोमेकॉत उपचारासाठी पाठवून दिले. (पान २ वर)
हणजूणमध्ये वृद्धेचा खून; महिला अत्यवस्थ
By admin | Updated: July 31, 2014 02:25 IST