शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

वाहन कर भरा आता आॅनलाईन

By admin | Updated: July 3, 2015 01:26 IST

पणजी : वाहनांची नोंदणी पुस्तिका (आरसी बुक) आता वाहतूक खाते स्मार्ट कार्डच्या रूपात देणार आहे. तसेच वाहनधारकांना सर्व प्रकारचे कर वाहतूक

पणजी : वाहनांची नोंदणी पुस्तिका (आरसी बुक) आता वाहतूक खाते स्मार्ट कार्डच्या रूपात देणार आहे. तसेच वाहनधारकांना सर्व प्रकारचे कर वाहतूक खात्याकडे आॅनलाईन पद्धतीने भरता येणार आहेत. अशा प्रकारच्या विविध योजनांचा शुक्रवारी सरकारकडून आरंभ केला जाणार आहे.मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक घेतली. कोणत्या सेवा आॅनलाईन करता येतील व कोणत्या सेवांचा आरंभ शुक्रवारी करता येईल, याची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली. विविध खात्यांना त्याबाबत सतर्क करण्यात आले.केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया सप्ताहाचे गोव्यात उद्घाटन शुक्रवारी सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री पार्सेकर हे करणार आहेत. पर्वरी येथील सचिवालयातील सेमिनार सभागृहात याबाबतचा कार्यक्रम होईल. राज्यातील अधिकाधिक सेवा आॅनलाईन करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. त्याचाच भाग म्हणून शुक्रवारी काही योजना सुरू होतील.वाहतूक खात्याकडे वाहनधारकांना विविध प्रकारचे कर व शुल्क भरावे लागते. रस्ता कर, प्रवासी कर वगैरेंचा यात समावेश होतो. वाहन नोंदणीवेळीही काही शुल्क व कर भरावे लागतात. हे सगळे कर यापुढे आॅनलाईन भरता येतील. ही माहिती वाहतूक खात्याचे संचालक अरुण देसाई यांच्याकडून मिळाली. वाहनांची नोंदणी आॅनलाईन करण्याची सोय आहे. मात्र, आता वाहन नोंदणी पुस्तिका स्मार्ट कार्डच्या रूपात दिली जाणार आहे. आज शुक्रवारी या सेवेचा आरंभ होईल, असे देसाई यांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)