शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंगप्रश्नी ‘त्या’ शिक्षकास शिक्षण खात्याकडून नोटीस

By admin | Updated: December 15, 2015 01:45 IST

पणजी : सांगे तालुक्यातील एका हायस्कूलच्या सहलीवेळी शिक्षकाने विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याच्या तक्रारीची गंभीर दखल

पणजी : सांगे तालुक्यातील एका हायस्कूलच्या सहलीवेळी शिक्षकाने विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याच्या तक्रारीची गंभीर दखल शिक्षण खात्याने घेतली आहे. खात्याने शिक्षकास नोटीस जारी केली असून येत्या गुरुवारी त्यास सुनावणीसाठी हजर राहण्यास बजावले आहे. सहलीवेळी शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्र्थिनीचा विनयभंग केला. तो मद्याच्या नशेत होता, अशीही चर्चा सुरू आहे. या प्रकरणी हायस्कूल व्यवस्थापनाने शिक्षण खात्याला गेल्या आठवड्यात कल्पना दिली. खात्याने या प्रकाराची दखल घेतली असून सत्य शोधून काढण्याचे ठरविले आहे. त्या विद्यार्र्थिनीच्या कुटुंबीयांनी घटनेची माहिती व्यवस्थापनाला दिलेली आहे. शिक्षण खात्याचे संचालक गजानन भट यांनी याविषयी ‘लोकमत’ला सांगितले, की व्यवस्थापन आणि संबंधित शिक्षक या दोघांनीही येत्या गुरुवारी सुनावणीसाठी बोलविण्यात आले आहे. दोघांचेही म्हणणे ऐकून घेतले जाईल. सखोल चौकशी केली जाईलच. शिक्षकास सेवेतून निलंबित करण्यापूर्वी नैसर्गिक न्यायाचा भाग म्हणून आम्हाला सुनावणी घ्यावी लागते. शिक्षक दोषी आढळला, तर त्यास निलंबित करण्यासाठी खात्याकडून व्यवस्थापनास परवानगी दिली जाईल. (खास प्रतिनिधी)