शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

42 कंपन्यांना 1200 कोटींच्या वसुलीसाठी नोटीसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 22:22 IST

राज्यातील 42 खाण कंपन्यांच्या खाण धंद्याची चौकशी करून चार्टर्ड अकाऊण्टंट्सच्या समितीने आपला अहवाल सरकारला दिला आहे.

पणजी : राज्यातील 42 खाण कंपन्यांच्या खाण धंद्याची चौकशी करून चार्टर्ड अकाऊण्टंट्सच्या समितीने आपला अहवाल सरकारला दिला आहे. त्या अहवालाच्या आधारे 1 हजार 200 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी पुढील महिन्याभरात सर्व 42 कंपन्यांना नोटीसा पाठविल्या जातील, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले. पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) एकूण नऊ बेकायदा खाण प्रकरणी चौकशी काम सुरू असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.सरकार राज्यातील खनिज व्यवसाय कधी सुरू करणार आहे व कोणती पाऊले उचलली जात आहेत अशी विचारणा करणारा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासावेळी विरोधी आमदारांनी मांडला होता. आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांच्यासह पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनीही सरकारला प्रश्न विचारला. विरोधात असताना भाजपने गोव्यात 28 हजार कोटींचा बेकायदा खाण घोटाळा सुरू असल्याचा आरोप केला होता, असा संदर्भ देऊन रेजिनाल्ड म्हणाले की भाजपमुळे खाण व्यवसाय बंद पडला. आता खाणी नव्याने सुरू करण्यासाठीही सरकार गंभीरपणो पाऊले उचलत नाही, उलट दोन कंपन्याच सर्वोच्च न्यायालयात गेल्याने डंप वाहतुकीचा आदेश तरी आला, असे रेजिनाल्ड म्हणाले.खाण धंदा सुरू करण्यासाठी कोणती पाऊले सरकारने उचलली त्याची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. बेकायदा खाण प्रकरणी सरकार कुणालाच सोडणार नाही. सगळी वसुली केली जाईल. पुढील महिन्याभरात नोटीसा जारी होतील. तसेच नऊ बेकायदा प्रकरणी एसआयटी चौकशी काम करत आहे. एसआयटीने कुणाचेच चौकशी काम बंद केलेले नाही. एका प्रकरणी तर एसआयटीने हायकोर्टातही आव्हान दिले आहे. काही प्रकरणी पुढील अधिवेशनापूर्वी प्रत्यक्ष कारवाई होईल. बेकायदा खाण प्रकरणी यापूर्वी 3 कोटी 99 लाख रुपयांची वसुली झाली आहे असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.मुख्यमंत्री म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच रॉयल्टी भरलेल्या खनिजाची वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. एकूण 1.45 दशलक्ष टन खनिज माल असा आहे, ज्याची रॉयल्टी भरली गेली आहे. त्याशिवाय 7.7 दशलक्ष टन खनिज माल पडून आहे. सहा महिन्यांत वाहतूक करता येईल. यापूर्वी सरकारने 22 ई-लिलाव केले. त्याद्वारे 16.81 दशलक्ष टन खनिजाचा लिलाव पुकारला गेला व 13.54 दशलक्ष टन खनिज विकले गेले. त्यातून सरकारला 130 कोटींचा महसुल मिळाला. राज्य सरकारने खाण बंदीविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिकाही सादर केली आहे असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.