वाळपई : पिसुर्ले-सत्तरीतील सरकारी विद्यालयातील मुख्याध्यापकाने दोन विद्यार्थ्यांना जबर मारहाण केल्याचा प्रकार गुरुवारी घडला. वाळपई पोलिसांनी मुख्याध्यापक माधव जोशी यांना अटक केल्यानंतर त्यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना वाळपई रुग्णालयात दाखल केले आहे. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पिसुर्ले विद्यालयात नववीतील दोन विद्यार्थी आपआपसात भांडण करू लागले होते. त्यांना मुख्याध्यापक जोशी यांनी काठीने बेदम मारले. मार एवढा जबरदस्त होता की दोघाही विद्यार्थ्यांच्या पाठीवर व पायावर वळ आले. तसेच जखमाही झाल्या. याबाबत दोघाही विद्यार्थ्यांनी सांगितले की, आम्ही दोघेही सिरीयस भांडत नव्हतो तर फक्त एकमेकांची चेष्टा करीत होतो. त्या वेळी अचानक हेड सर आले आणि आम्हा दोघांनाही काहीही न विचारता काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. एका विद्यार्थ्याच्या आईने तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक संजीव दळवी तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
नववीतील दोघा मुलांना मुख्याध्यापकाने बदडले
By admin | Updated: June 27, 2014 01:35 IST