शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसशी राष्ट्रवादीची युती शक्य : डिसोझा

By admin | Updated: November 27, 2015 01:27 IST

पणजी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कोणत्याही समविचारी पक्षाशी युती करण्यास तयार आहे

पणजी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कोणत्याही समविचारी पक्षाशी युती करण्यास तयार आहे. काँग्रेस पक्षाशीदेखील युती होऊ शकते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी सांगितले. काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकीवेळी स्वतंत्रपणे चाळीसही जागा लढविल, अशी भूमिका यापूर्वी दिग्विजय सिंग व प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी मांडली आहे. याविषयी जुझे फिलिप यांना प्रतिक्रिया विचारली असता, ते म्हणाले की राज्यातील सर्र्व धर्र्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र यायला हवे. अपक्ष आमदारांशी युती होऊ शकत नाही; पण राजकीय पक्षांशी युती होऊ शकते. काँग्रेस असो किंवा अन्य कोणता पक्ष असो, जो धर्र्मनिरपेक्ष तत्त्व मानतो अशा पक्षाशी युती करण्यास आम्ही तयार आहोत. निवडणुका जाहीर होतील, त्या वेळी युतीची प्रक्रिया सुरू होईल. बिहारप्रमाणेच गोव्यातही आघाडी स्थापन व्हायला हवी.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष व उत्तर गोव्यातील सर्व मतदारसंघांसाठी राष्ट्रवादीचे प्रमुख देवानंद नाईक यांनीही आपण जुझे फिलिप डिसोझा यांच्या मताशी सहमत असल्याचे सांगितले. विविध धर्मनिरपेक्ष शक्ती एकत्र आल्या तर सत्ता दूर नाही. धर्मनिरपेक्ष तत्त्व मानणाऱ्या पक्षांशी आम्ही हातमिळवणी करण्यास तयार आहोत. २०१२ च्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसला सात जागा काँग्रेस पक्षाने दिल्या होत्या, असे नाईक म्हणाले. (प्रतिनिधी)