शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

पालिका कायदा दुरुस्त करणार

By admin | Updated: July 6, 2015 00:52 IST

पणजी : पालिका क्षेत्रांमधील बेकायदा बांधकामे तसेच अन्य प्रकरणांबाबत आव्हान याचिकांचे (अपील) कामकाज राज्य प्रशासकीय लवादाकडून काढून घेण्यात येणार आहे

पणजी : पालिका क्षेत्रांमधील बेकायदा बांधकामे तसेच अन्य प्रकरणांबाबत आव्हान याचिकांचे (अपील) कामकाज राज्य प्रशासकीय लवादाकडून काढून घेण्यात येणार आहे. आता हे कामकाज पालिका खात्यातच अतिरिक्त संचालक नेमून त्यांच्याकडे सोपविले जाईल. यासंदर्भात येत्या विधानसभा अधिवेशनात पालिका कायद्यात दुरुस्ती विधेयक मांडले जाणार आहे. ही दुरुस्ती मंजूर झाल्यास बांधकामे तसेच अन्य प्रकरणांतील नगरपालिकांच्या आदेशास आव्हान देण्यासाठी पंचायतींच्या धर्तीवर पालिका प्रशासनातही अतिरिक्त संचालकाची नियुक्ती होईल.गोवा नगरपालिका कायद्याच्या कलम १८४ मध्ये ही दुरुस्ती आणली जाणार आहे. पालिकेने दिलेल्या आदेशाविरुद्ध दाद मागण्यासाठी सध्या प्रशासकीय लवादाकडे आव्हान याचिका दाखल करावी लागते. लवाद म्हणजे न्यायालयीन अधिकारिणी होय. लवादाने दिलेल्या कोणत्याच आदेशाचा फेरआढावा सरकारला घेता येणार नाही, असा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिलेला आहे. त्यामुळे पालिका कायद्यात दुरुस्ती आणून आव्हान याचिकांच्या कामकाजाचे अधिकार अतिरिक्त संचालकांना देण्याचे सरकारने ठरविले आहे. अशी व्यवस्था पंचायत खात्यात आहे. ग्रामपंचायतींनी बांधकामासंबंधी दिलेल्या आदेशाविरुद्ध अतिरिक्त संचालक किंवा संचालकांकडे आव्हान देता येते. थेट लवादाकडे जावे लागत नाही. पंच, सरपंच, उपसरपंच आदी व्यक्तींविरोधातही या अधिकाऱ्यांकडे तक्रार करून न्याय मिळवता येतो. पालिका प्रशासनात तशी व्यवस्था नाही. लवादाचे दरवाजे ठोठवावे लागतात. (प्रतिनिधी)