शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

देहदानाची प्रेरणास्रोत मुकली देहदानास...

By admin | Updated: May 24, 2015 01:20 IST

जुन्या पिढीतील असूनही क्रांतिकारी विचाराने भारलेल्या ७८ वर्षे वयाच्या महिलेने मृत्यूनंतर

वासुदेव पागी ल्ल पणजीजुन्या पिढीतील असूनही क्रांतिकारी विचाराने भारलेल्या ७८ वर्षे वयाच्या महिलेने मृत्यूनंतर देहदानाची इच्छा व्यक्त केली होती. गुरुवारी त्यांचे निधन झाल्यानंतर मृतदेह गोमेकॉच्या स्वाधीनही केला; परंतु तांत्रिक मुद्द्यावरून गोमेकॉस मृतदेह नातेवाईकांना परत करावा लागला.या महिलेचे नाव सविता खटखटे असे आहे. त्या अंधेरी-मुंबई येथील आहेत. त्या सार्वजनिक क्षेत्रातही होत्या. विशेषत: देहदान चळवळीत त्यांनी झोकून दिले होते. त्यांनी देहदानाचे इच्छापत्र दिले होतेच, शिवाय अनेकाना देहदानासाठी प्रेरितही केले होते. राष्ट्र सेवा दलाच्या त्या कार्यकर्त्याही होत्या. खटखटे वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) येथे आल्या असता शुक्रवारी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. म्हापसा येथील एका खासगी इस्पितळात त्यांना दाखल केले;परंतु उपचारांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांचे निधन झाले. खटखटे यांच्या इच्छेनुसार देहदानासाठी त्यांचा मृतदेह गोमेकॉत आणला गेला. त्या ठिकाणी गोमेकॉकडून काही सोपस्कार करून मृतदेह गोमेकॉच्या ताब्यातही घेण्यात आला; परंतु सविता यांचे पुत्र आश्विन खटखटे यांना अपेक्षा भंग करणारी माहिती गोमेकॉकडून देण्यात आली. तांत्रिक कारणामुळे त्यांच्या आईचा मृतदेह ते स्वीकारू शकत नाहीत, असे त्यांना सांगण्यात आले. त्यांना हॅपिटायटीस बी इन्फेक्शन होते. त्यामुळेच त्यांचे निधन झाले होते. हॅपिटायटीस बी इन्फेक्शन असलेला मृतदेह अ‍ॅनॉटमी विभागात ठेवला जात नाही. शरीरशास्त्राच्या विद्यार्थ्यांनाही ते इन्फेक्शन होण्याची शक्यता असते, असा गॉमेकॉचा दावा आहे. मृतदेह तूर्त गोमेकॉच्या शवागारात ठेवला आहे. नातेवाईकांना तो ताब्यात घेण्यास सांगितले आहे.देहदानासाठी अनेकजण पुढे येउ लागले आहेत. परंतु ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी गोमेकॉतून प्रयत्न होणे गरजेचे आहे.