शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

सरकारच्या खर्चाने मंत्र्यांची जगभ्रमंती

By admin | Updated: June 18, 2014 07:24 IST

पणजी : लोकांनी टीका करो किंवा ‘कॅग’ने आक्षेप घेवो. मात्र, कशाचीही पर्वा न करता गोव्यातील अनेक मंत्री व आमदार वारंवार विदेश दौरे करत असल्याचे

पणजी : लोकांनी टीका करो किंवा ‘कॅग’ने आक्षेप घेवो. मात्र, कशाचीही पर्वा न करता गोव्यातील अनेक मंत्री व आमदार वारंवार विदेश दौरे करत असल्याचे आढळून आले आहे. शासकीय खर्चाने काही मंत्री तर जग फिरले आहेत. अजूनही विदेश वाऱ्या सुरू आहेत. शासकीय खर्चाने ब्राझीलच्या दौऱ्यावर जाण्याचा विषय गोव्याच्या काही मंत्री व आमदारांच्या नुकताच अंगलट आला. देशभरातून त्यावर टीका झाल्याने आता आपण शासकीय खर्चाने ब्राझीलला जाणार नाही, असे मंत्री व आमदारांना जाहीर करावे लागले. काही अधिकारीही वारंवार विदेश दौरे करत आहेत. यापुढे पर्यटन खाते बराच मोठा खर्च करून युरोपचा दौरा करणार आहे. सेंट झेवियरचा शव प्रदर्शन सोहळा येत्या नोव्हेंबरमध्ये होणार आहे. दर दहा वर्षांनी हा सोहळा होतो. यापूर्वी कधीच कुणी युरोपमध्ये फिरून या सोहळ्याबाबत जागृती केली नाही. मात्र, या वेळी सरकारमधील काहीजणांना युरोपमध्ये फिरून येण्याची व तिथे रोड शो करण्याची संधी ‘गोंयच्या सायबा’ने दिली आहे. त्या मोहिमेची तयारी सध्या सुरू आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्प पाहण्यासाठी यापूर्वी जर्मनीमध्ये बरेच मोठे ताफे पाठविण्यात आले होते. त्यावर काही कोटी रुपयांचा खर्च झाला. उपमुख्यमंत्र्यांसह काही मंत्री, आमदार, सरकारी अधिकारी वगैरे त्या वेळी जर्मनीला जाऊन तेथील कचरा प्रक्रिया प्रकल्प पाहून आले. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा हे पोर्तुगालच्या दौऱ्यावर गेले होते. एक-दोन मंत्री वगळता बहुतेक मंत्र्यांनी, भाजपच्या बहुतेक आमदारांनी व एक-दोन अपक्ष मंत्री-आमदारांनी गेल्या दोन वर्षांत बरेच विदेश दौरे केले आहेत. बहुतेक दौऱ्यांवर सरकारने लाखो रुपयांचा खर्च केला. यापूर्वी ‘कॅग’ने आपल्या अहवालांत या सगळ्या खर्चावर बोट ठेवले आहे. मोठ्या प्रमाणात विदेशात झालेले रोड शो हेही चर्चेचे विषय बनले आहेत. २00७ ते २0१२ या कालावधीत राज्य सरकारकडून रोड शोवर १९ कोटी खर्च करण्यात आले. (खास प्रतिनिधी)