काणकोण : काणकोणचे आमदार तथा क्रीडामंत्री रमेश तवडकर यांना शिवीगाळ आणि जातिवाचक शब्द वापरल्याप्रकरणी नगर्से येथील जयदीप गावकर याच्याविरुध्द ९१/८१ कलमाखाली काणकोण पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, गावकर याला सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. मंत्री तवडकर यांनी ४ मे रोजी यासंबंधीची तक्रार काणकोण पोलीस स्थानकात नोंदवली होती. (प्रतिनिधी)
मंत्री तवडकरांना शिवीगाळ
By admin | Updated: May 7, 2014 00:53 IST