शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

हा मिनी वर्ल्डकपच - निकोलए अ‍ॅडम

By admin | Updated: October 4, 2016 19:31 IST

देशातील आघाडीच्या पाच देशांचा समावेश असलेली ‘ब्रिक्स’ स्पर्धा म्हणजे मिनी वर्ल्डकपच. १७ वर्षांखालील विश्वचषकासाठी या स्पर्धेतील प्रत्येक सामना महत्त्वाचा असून आम्ही

ऑनलाइन लोकमत

पणजी, दि. 04 -  देशातील आघाडीच्या पाच देशांचा समावेश असलेली ‘ब्रिक्स’ स्पर्धा म्हणजे मिनी वर्ल्डकपच. १७ वर्षांखालील विश्वचषकासाठी या स्पर्धेतील प्रत्येक सामना महत्त्वाचा असून आम्ही रशियाविरुद्ध सकारात्मक सुरुवात करण्याचा प्रयत्न करू, असे भारताचे प्रशिक्षक निकोलए अ‍ॅडम यांनी सामन्यापूवी सांगितले. हा सामना बांबोळी येथील मैदानावर होईल. उद्घाटनीय सामना ब्राझील आणि चीन यांच्यात होईल. स्पर्धेत पाचही संघ आज गोव्यात पोहचतील.अ‍ॅडम म्हणाले, काही खेळाडूंच्या किरकोळ दुखापती सोडल्या तर संपूर्ण संघ मजबूत आहे. अनिकेत जाधव दुखापतग्रस्त होता तो सुद्धा आता ‘फिट’ आहे. रशिया हा मजबूज संघ आहे. त्यांनी क्वालिफाइंग अभियान ९ गुणांसह पूर्ण केले होते. या संघाचा आम्ही आदर करतो. त्यांच्याविरुद्ध खेळणे आव्हानात्मक असेल. यामुळे आम्हाला बारकाव्यांवर नजर ठेवावी लागेल. ही स्पर्धा खेळाडूंच्या अनुभवासाठी महत्त्वाची आहे. खेळाडूंनी आपल्या खेळात सुधारणा केल्या असून १६ वर्षांखालील एएफसी चषकातही चांगले प्रदर्शन केले आहे. मात्र, भारतीय संघाला स्पर्धेत अंतिम फेरी गाठता आली नव्हती.

एएफसीला पत्रभारतीय संघ बोरीस थंगजामशिवाय मैदानात उतरेल. त्याला एएफसी स्पर्धेत इराणविरुद्धच्या सामन्यात दुसरे पिवळे कार्ड दाखविण्यात आले होते. पिवळे कार्ड दाखवल्याबद्दल प्रशिक्षक अ‍ॅडम यांनी नाराजी व्यक्त केली. एएफसीसारख्या मोठ्या स्पर्धेत उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून मोठ्या अपेक्षा असतात. पंचांच्या या निर्णयावर आपण एएफसीला पत्र पाठविले आहे. त्यांच्या या निर्णयाचे आपणास दु:ख झाल्याचेही अ‍ॅडम यांनी सांगितले.दुसरीकडे, भारताचा कर्णधार सुरेश सिंह म्हणाला की, जेव्हापासून निकोलए अ‍ॅडम संघाचे प्रशिक्षक झाले तेव्हापासून खूप बदल झालेला नाही. त्यांच्याकडून खूप शिकायला मिळाले. फुटबॉलमधील बारकाव्यांचा त्यांना मोठा अभ्यास आहे. प्रत्येक खेळाडूवर लक्ष असते. आम्ही स्पर्धेत चांगले प्रदर्शन करू, असा विश्वास आहे.

विश्वचषकाची तयारी जोरात : दमित्रीविश्वचषकापूर्वी भारतात १७ वर्षांखालील स्पर्धा खेळण्याची संधी मिळत आहे. हा अनुभव आमच्या संघासाठी महत्त्वपूर्ण असेल. स्पर्धेत दिग्गज संघ आहेत. आम्ही सुद्धा आगामी विश्वचषक पुढे ठेवून तयारी करीत आहोत. गेल्या दोन वर्षांपासून हा संघ एकत्र आहे. संघातील खेळाडूंचा चांगला अभ्यास झाला असून त्यांच्यात ताळमेळही उत्तम आहे. भारताविरुद्ध विजयासाठी आम्ही सुरुवात करण्याचा प्रयत्न करणार, असे रशियाचा प्रशिक्षक दमित्री उलयानोव्ह याने सांगितले. दरम्यान, या स्पर्धेत ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका संघांचा समावेश आहे.