शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

खनिज वाहतूक आजपासून?

By admin | Updated: December 14, 2015 01:11 IST

फोंडा : मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या विनंतीवजा आवाहनाकडे दुर्लक्ष करून अखिल गोवा ट्रकमालक संघटना आपले

फोंडा : मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या विनंतीवजा आवाहनाकडे दुर्लक्ष करून अखिल गोवा ट्रकमालक संघटना आपले आंदोलन सुरूच ठेवण्याबाबत ठाम असून खनिज वाहतुकीसाठी रास्त दर मिळेपर्यंत माघार नाही, अशी ठाम भूमिका संघटनेने घेतल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. दुसरीकडे सेसा कंपनीसंबंधित उपजिल्हाधिकारी तसेच अन्य यंत्रणांना निवेदने देऊन सोमवारी पोलीस बंदोबस्तात खनिज वाहतूक सुरू करण्याच्या हालचाली करीत असून सोमवारी बॉम्बे रोड जंक्शनवर राडा होण्याची दाट शक्यता खाणपट्ट्यात व्यक्त होत आहे. प्राप्त माहितीनुसार, सेसा कंपनीतर्फे सोमवारपासून खनिज वाहतूक सुरू करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. रविवार (दि. १३) असूनही काही ट्रक भरले गेल्याचेही विश्वसनीय वृत्त आहे. ट्रकमालक संघटनेकडून असणारा संभाव्य धोका लक्षात घेता सेसातर्फे डिचोली उपजिल्हाधिकारी, मामलेदार, पोलीस तसेच अन्य संबंधित यंत्रणांना निवेदने दिली जाणार असून दुपारपर्यंत खनिज वाहतूक सुरू केली जाणार आहे. दुसरीकडे ट्रकमालक संघटनेने कोणत्याही परिस्थितीत रास्त वाहतूक दर मिळेपर्यंत खनिज वाहतूक सुरू करू देणार नाही, अशी भूमिका घेतल्याने सोमवारी ट्रकमालकांचे आंदोलन भडकण्याची शक्यता आहे. यासंबंधी ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष नीळकंठ गावस यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. मात्र, संघटनेशी संबंधित ट्रकमालकाच्या माहितीनुसार, संघटना सरकार तसेच सेसा कंपनीच्या दडपशाहीविरुध्द कोणत्याही स्तराला जाण्यास तयार असून माघार घेणार नाही. (प्रतिनिधी)