शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
3
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
4
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
5
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
6
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
7
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
8
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
9
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
10
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
11
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
12
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
13
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
14
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
15
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
16
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
17
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
19
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
20
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती

खाण घोटाळाही रडारवर

By admin | Updated: August 23, 2015 01:59 IST

पणजी : जैका-लुईस बर्जर लाच प्रकरणात बडे राजकीय नेते कचाट्यात सापडले असतानाच आता खनिज घोटाळ्यात अडकलेल्या मोठ्या राजकीय प्रस्थांनाही

पणजी : जैका-लुईस बर्जर लाच प्रकरणात बडे राजकीय नेते कचाट्यात सापडले असतानाच आता खनिज घोटाळ्यात अडकलेल्या मोठ्या राजकीय प्रस्थांनाही चौकशीसाठी समन्स बजावण्यात येणार असल्याची माहिती विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) सूत्रांकडून देण्यात आली. खनिज घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे, विश्वजित राणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल हेदे, अनिल साळगावकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून चौकशी करण्यात आली होती, तर एका प्रकरणात दिगंबर कामत यांना याआधीच समन्स बजावण्यात आले होते. दरम्यान, अनिल साळगावकर व ज्योकिम आलेमाव यांना शनिवारी एसआयटीने समन्स बजावले. खनिज घोटाळा प्रकरणाच्या तपास कामाने वेग घेतला असून या प्रकरणात अडकलेल्या बड्या राजकीय नेत्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात येणार आहेत. त्यापैकी काही जणांना अटकही होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस मुख्यालयातील सूत्रांकडून देण्यात आली. त्यामुळे येत्या काही दिवसांत महत्त्वपूर्ण घडामोडी होण्याची शक्यता आहे. एसआयटीचे प्रमुख असलेले पोलीस उपमहानिरीक्षक कमलाकांत व्यास यांना याविषयी विचारले असता, त्यांनी या वृत्ताला पुष्टी दिली. ते म्हणाले की, खानिज घोटाळ्यातील तपासाने वेग घेतला असून या प्रकरणाशी संबंध असलेल्यांना समन्स बजावून चौकशी करणे, हा तपासाचाच भाग आहे. राणे पिता-पुत्र, प्रफुल्ल हेदे यांनाही समन्स बजावले जाणार आहे काय, या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी, पोलीस गरज भासल्यास कुणालाही व केव्हाही समन्स बजावू शकतात, असे सांगितले. (प्रतिनिधी)