शहरं
Join us  
Trending Stories
1
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
4
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
6
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
7
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
8
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
9
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
10
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
11
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
12
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
13
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
14
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
15
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
16
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
17
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
18
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
19
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
20
Khushbu Saroj : अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान

मिकी पाशेको ‘बेपत्ता’

By admin | Updated: April 12, 2015 01:07 IST

पणजी/मडगाव : अटक वॉरन्ट घेऊन पोलीस आपल्या मागावर आहेत आणि दुसऱ्या बाजूने फेरविचार याचिकेच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाकडून

पणजी/मडगाव : अटक वॉरन्ट घेऊन पोलीस आपल्या मागावर आहेत आणि दुसऱ्या बाजूने फेरविचार याचिकेच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाकडून काही दिलासा मिळालेला नाही, अशा परिस्थितीत अटक चुकविण्यासाठी भाजप सरकारमधील माजी मंत्री आमदार मिकी पाशेको हे बेपत्ता झाले आहेत. दरम्यान, मोबाईलच्या टॉवर लोकेशनद्वारे पाशेको यांचा पत्ता लावण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. तसेच पाशेको यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेल्या व्यक्तींचे मोबाईलही पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती पणजी पोलीस मुख्यालयातील सूत्रांकडून देण्यात आली.पाशेको यांच्याविरुद्ध अटक वॉरन्ट जारी करण्यासाठी अर्ज करणारे अ‍ॅड. आयरिश रॉड्रिगीस यांनी शनिवारी सभापती राजेंद्र आर्लेकर यांच्याशी संपर्क साधून पाशेको गायब झाल्याची तक्रार करा, अशी मागणी केली. आपल्या मागणीला सभापतींकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचा दावा अ‍ॅड. रॉड्रिगीस यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. दरम्यान, उद्भवलेल्या परिस्थितीवर कसा तोडगा काढता येणे शक्य आहे, याची चाचपणी करण्यासाठी पाशेको यांचे जवळचे मित्र लिंडन मोन्तेरो यांनी दिल्लीत धावघेतली आहे.कोलवा पोलिसांना अजूनही पाशेको यांचा थांगपत्ता लागलेला नसून त्यांना पकडण्यासाठी आमचे सर्व ते प्रयत्न चालू आहेत, अशी माहिती दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी दिली.या संदर्भात कोलवाचे पोलीस निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पाशेको यांच्या बेताळभाटी येथील कार्यालयात व घरात जाऊन पोलिसांनी चौकशी केली असता, पाशेको तेथे सापडले नाहीत. त्यांच्या मित्राकडेही चौकशी केली; मात्र त्यांचा पत्ता मिळू शकला नाही.कपिल नाटेकर मारहाण प्रकरणात दोषी ठरलेल्या आणि सहा महिन्यांची शिक्षा भोगायची असलेल्या पाशेको यांच्या विरोधात मडगावच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पूजा कवळेकर यांनी अजामीन अटक वॉरन्ट गुरुवारी जारी केले होते. सात दिवसांत पाशेको यांना अटक करून न्यायालयात हजर करावे, असा आदेश न्या. कवळेकर यांनी दिला होता. (प्रतिनिधी)