शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

माध्यम विधेयक चिकित्सा समितीकडे

By admin | Updated: August 22, 2014 01:29 IST

पणजी : माध्यम धोरणाला पाठबळासाठी आणलेले गोवा शालेय शिक्षण दुरुस्ती विधेयक चिकित्सा समितीकडे पाठवले तर अन्य चार विधेयके विधानसभेत मंजूर करण्यात आली.

पणजी : माध्यम धोरणाला पाठबळासाठी आणलेले गोवा शालेय शिक्षण दुरुस्ती विधेयक चिकित्सा समितीकडे पाठवले तर अन्य चार विधेयके विधानसभेत मंजूर करण्यात आली. अल्पसंख्याकांच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांना सरकारी अनुदानासाठी द्वैभाषिक पाठ्यपुस्तके लागू करणे तसेच इयत्ता आठवीपर्यंत कोकणी किंवा मराठी एक विषय सक्तीचा करणे, अशा तरतुदी या विधेयकात होत्या. या विधेयकाला आमदारांकडून दुरुस्त्या आल्याने ते चिकित्सा समितीकडे पाठवले. कूळ तसेच मुंडकार प्रकरणे तीन वर्षांच्या कालावधीत निकालात काढण्याची तसेच एकदा अर्ज आल्यानंतर वर्षभराच्या आत त्यावर निर्णय घेण्याची तरतूद असलेली दोन वेगवेगळी दुरुस्ती विधेयके मंजूर करण्यात आली. कूळ प्रकरणे मामलेदारांकडून काढून दिवाणी न्यायालयांकडे सोपविली जातील व अपील असल्यास ते जिल्हा न्यायालयात करावे लागेल. या बाबतीत आधी संयुक्त मामलेदारांनी दिलेले निवाडे ग्राह्य धरले जातील. कराराद्वारे जमिनी कसण्याची तरतूदही कूळ दुरुस्ती कायद्यात केली आहे. जमीनमालक आणि जमीन कसायला घेणारा, या दोघांमध्ये करार होईल. कसणाऱ्याला कूळ म्हणून दावा करता येणार नाही. गुंतवणूक धोरणाला पाठबळासाठी गुंतवणूक उत्तेजन धोरणही मंजूर करण्यात आले. यान्वये गुंतवणूक मंडळ स्थापन करण्यात येणार असून एक खिडकी योजनेखाली उद्योजकांचे अर्ज ठरावीक कालावधीत निकालात काढले जातील. हे विधेयकही मंजूर केले. सहकार संस्था दुरुस्ती कायद्यात दुरुस्तीचे मंत्री दीपक ढवळीकर यांनी मांडलेले विधेयकही मंजूर करण्यात आले. (प्रतिनिधी)