शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
2
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
3
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
4
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
5
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
6
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
7
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
8
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
9
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
10
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
11
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
12
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
14
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
15
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
16
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
17
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
18
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
19
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
20
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार

मनोहर पर्रीकर गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान

By admin | Updated: March 14, 2017 18:00 IST

गोव्याचे 13वे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकर यांना राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी शपथ दिली आहे.

ऑनलाइन लोकमत पणजी, दि. 14 - गोव्याचे 13वे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकर यांना राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी शपथ दिली आहे. पर्रीकरांनी कोकणी भाषेत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून, पर्रीकरांसोबत आणखी 13 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. मनोहर पर्रीकर हे चौथ्यांदा गोव्याचं मुख्यमंत्रिपद सांभाळत आहेत. मनोहर पर्रीकरांसोबत भाजपाच्या फ्रान्सिस डिसुजा, पांडुरंग मडकेकर, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदीन ढवळीकर, मनोहर त्रिंबक आजगावकर, गोवा फॉरवर्ड पक्षाच्या विजय सरदेसाई, विनोद पालेकर, अपक्ष गोविंद गावडे, रोहन खवंटे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पर्रीकरांना आणखी दोन आमदारांनी पाठिंबा दिला आहे. चर्चिल आलेमाव आणि प्रसाद गावकर मनोहर पर्रीकरांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. आता पर्रीकरांकडे एकूण 23 आमदारांचा पाठिंबा आहे. गोव्यात भाजपाच्या सत्ता स्थापनेला स्थगिती देण्यासाठी काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र काँग्रेसची याचिका फेटाळत गोवा विधानसभेत भाजपाला 16 मार्च रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मनोहर पर्रिकर यांचा सत्ता स्थापनेचा दावा फेटाळून लावण्यासंदर्भात अनेक प्रश्न विचारून सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसला धारेवर धरले होते.

(गोव्यात मनोहर पर्रिकरांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा)('या' चुकीमुळे गोव्यात काँग्रेस बसणार विरोधी बाकांवर)
मात्र या शपथविधी सोहळ्यादरम्यान काँग्रेसचे 17 आमदार दिग्विजय सिंह यांच्यासोबत राजभवनात हजर झाले असून, त्यांनी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असल्यानं आम्हाला पहिलं सरकार बनवण्याचं आमंत्रण दिलं पाहिजे, अशी मागणी केली आहे. 40 सदस्यांच्या गोवा विधानसभेत बहुमतांसाठी 21 सदस्यांची आवश्यकता आहे. भाजपाचे 13 आमदार निवडून आले. काँग्रेसचे संख्याबळ 17 आहे. असे असतानाही भाजपाने छोटया पक्षांना आणि अपक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली आहे. भाजपाप्रणीत आघाडीकडे गोवा फॉरवर्ड, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि अपक्ष तीन मिळून एकूण 23 आमदारांचे संख्याबळ आहे.