शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मणिपुरी अतिरेक्यांचा मला ठार मारण्याचा डाव होता

By admin | Updated: May 22, 2015 02:35 IST

पणजी : ‘मणिपूरमध्ये काम करीत असताना मणिपुरी अतिरेक्यांनी आपल्याला ठार मारण्याचा डाव रचला होता,’ अशी धक्कादायक माहिती कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष

पणजी : ‘मणिपूरमध्ये काम करीत असताना मणिपुरी अतिरेक्यांनी आपल्याला ठार मारण्याचा डाव रचला होता,’ अशी धक्कादायक माहिती कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्षलुईझिन फालेरो यांनी गुरुवारी येथे उघड केली आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कॉँग्रेस हाउसमध्ये आयोजित कार्यक्रमात फालेरो यांनी ही माहिती दिली. मणिपूरमध्ये आपण कॉँग्रेस पक्षाचे काम करीत असताना अतिरेक्यांचा धोका पत्करून काम करणे भाग होते. आपल्यावर मणिपूरची जबाबदारी हायकमांडने दिल्यामुळे आपण ती अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. त्या ठिकाणी काम करीत असताना अतिरेक्यांनी आपल्याला ठार मारण्याचा डावही रचला होता,असे त्यांनी सांगितले.या कटाचे नंतर काय झाले व ते कसे बचावले इतर माहिती त्यांनी सांगितली नाही; परंतु कॉँग्रेस पक्षाचे काम किती जोखीम घेऊन आपण व आपल्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी केले होते, याची प्रचीती त्यांनी या घटनेचा उल्लेख करून दिली. राजीव गांधी यांनी दहशतवादाविरोधीचा लढा यशस्वी पद्धतीने लढला होता. मिझोरामसारख्या ठिकाणी सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया त्यांच्याच प्रयत्नांमुळे बंद झाल्या आणि त्यांच्याच प्रेरणेने मणिपूर व इतर ठिकाणी सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांविरोधी लढा कॉँग्रेसने चालविल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादाच्या गोष्टी करणाऱ्या भाजपने काश्मीरमध्ये पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या मुफ्ती महम्मद सईद यांच्याशी सलगी करून आपल्याला सत्तेपुढे राष्ट्रहिताची किंमत नसल्याचे दाखवून दिल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे, माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन, माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो व इतर नेते उपस्थित होते.(प्रतिनिधी)