शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

मंगळसूत्र चोरणारी टोळी म्हापशात जेरबंद

By admin | Updated: April 12, 2015 01:10 IST

बार्देस : पेडे-म्हापसा येथील जिल्हा इस्पितळाच्या औषधालयामध्ये औषधे विकत घेताना वासंती वासुदेव राठवड या ६५ वर्षीय महिलेचे

बार्देस : पेडे-म्हापसा येथील जिल्हा इस्पितळाच्या औषधालयामध्ये औषधे विकत घेताना वासंती वासुदेव राठवड या ६५ वर्षीय महिलेचे मंगळसूत्र लांबवणारी पाच महिलांची टोळी अमिता येंडे या महिलेच्या समयसूचकतेमुळे रंगेहाथ पकडली गेली. म्हापसा पोलिसांनी या पाचही संशयित महिलांना अटक केली. ही आंतरराज्य टोळी असावी, असा कयास पालिसांनी व्यक्त केला आहे.म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी दुपारी१ वाजण्याच्या सुमारास घडली. वासंती राठवड या आपली मुलगी अमिता येंडे व दोन नातवंडांना घेऊन या फार्मसीमध्ये औषधे घ्यायला गेल्या होत्या. औषधे घेत असताना पाच महिला त्यांच्याजवळ आल्या. वासंती यांच्या नकळत त्यांना घेराव घातला व त्यांनीही फार्मसीतून काही औषधे खरेदी केली. फार्मसीवाल्याला एक हजार रुपयांची नोट देऊन शिल्लक पैसे घेतले. या दरम्यान एकीने वासंती यांच्या गळ्याभोवती शिताफीने ओढणी टाकून अलगद कटरने सुमारे ७० हजार रुपयांचे मंगळसूत्र लांबविले.दरम्यान, वासंती यांची मुलगी अमिता येंडे हिने आपल्या आईच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत नसल्याचे आईला सांगितले. हे मंगळसूत्र त्या पाच महिलांनीच लांबवले असावे, असा तर्क करून अमिता त्यांच्याकडे गेली व फार्मसीवाल्याकडे तुमचे पैसे राहिल्याचे सांगितले. पैसे परत घेण्यासाठी त्या पुन्हा फार्मसीकडे आल्या, त्या वेळी त्यांच्या हातातील लांबविलेले मंगळसूत्र खाली पडले. अमिताने ते पाहिले व त्वरित उचलून आरडाओरडा केला. त्या वेळी चोरट्या महिलांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र तेथील लोकांनी त्यांना पकडून ठेवले.संशयितांची नावे गायत्री गणेश (वय २०), वसता पद्मा (वय ४०), बसंती राजू (वय ३३), लक्ष्मी अभिमन्यू (वय २९), शांती शिवा कार्शी (वय ३३) आहेत. तपासावेळी पोलिसांना चकविण्यासाठी अनेक क्लृप्त्या त्यांनी वापरल्या. त्यामुळे या महिला सराईत असल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी हवालदार दयानंद साळगावकर तपास करीत आहेत. या कारवाईत सुशांती गोजेकर, प्रतीक्षा पेडणेकर, गीता पालयेकर व इतर महिला पोलिसांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)