शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

‘मगो’ची गोव्यात स्वबळाची भाषा

By admin | Updated: September 19, 2016 04:59 IST

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे कार्यकर्ते स्वबळावर लढण्याची भाषा करत असून, निवडणुकीत जनता सर्वांना जागा दाखवून देईल, अशा संतप्त प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली

पणजी : आम्हाला गृहीत धरू नका, या भाजपाने दिलेल्या इशाऱ्याने चिडलेले महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे कार्यकर्ते स्वबळावर लढण्याची भाषा करत असून, निवडणुकीत जनता सर्वांना जागा दाखवून देईल, अशा संतप्त प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केल्या.शनिवारी भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (मगो) व भारतीय भाषा सुरक्षा मंचचे समन्वयक प्रा. सुभाष वेलिंगकर यांना अप्रत्यक्ष इशारा देण्यात आला होता. त्यावर मगोचे खजिनदार आपा तेली तसेच श्रीधर मांद्रेकर, दामू दिवकर, सुदेश मळकर्णेकर, महेश पणशीकर (सर्व मध्यवर्ती कार्यकारिणी सदस्य) चिडले आहेत. भाजपाने युतीचा धर्म किती पाळला, हे सर्वांना ठाऊक आहे. केवळ वाद नको म्हणून आम्ही मौन पाळून होतो. दीपक ढवळीकर यांचे महत्त्वाचे सहकार खाते काढले. लवू मामलेदार यांना महामंडळ देऊन बोळवण केली. त्यांना फोंड्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून फारच उपद्रव झाला. २0१२मध्ये युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मगो पक्षाला सामावून घ्यायला हवे होते, तसे घेतलेच नाही. पाच वर्षांत पक्षाला दुय्यम वागणूक दिल्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात उपेक्षितपणाची भावना आहे, असे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांना कार्यकर्त्यांमधील असंतोषाबद्दल विचारले असता, २४ सप्टेंबरला पक्षाची मध्यवर्ती कार्यकारिणी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत सर्व प्रश्नांवर चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) >बांधकाम खाते उपकार नव्हेआम्हाला कोणी इशारा देण्याची गरज नाही, बांधकाम खाते देऊन उपकार केलेले नाहीत. निवडणूकपूर्व युतीचा करार म्हणून मंत्रिपदे दिली गेली. युती होती म्हणूनच भाजपाचे २१ उमेदवार निवडून आले. आता युती नको असेल तर मगोला बाहेर ठेवून २६ उमेदवार निवडून आणून दाखवावेत, असे आव्हान पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.