शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मडकईकरांची ‘एसीबी’कडून चौकशी

By admin | Updated: July 24, 2014 01:27 IST

पणजी : पोलीस स्थानकासाठी संपादन करण्यासाठी मंजूर करण्यात आलेली जमीन विकत घेण्याच्या प्रकाराबद्दल आमदार पांडुरंग मडकईकर यांची सीबीआयकडून

पणजी : पोलीस स्थानकासाठी संपादन करण्यासाठी मंजूर करण्यात आलेली जमीन विकत घेण्याच्या प्रकाराबद्दल आमदार पांडुरंग मडकईकर यांची सीबीआयकडून चौकशी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले. जुने गोवे परिसरात आॅगस्ट २००४ साली पोलीस स्थानक बांधण्यासाठी मडकईकर यांनी ५ हजार चौरस मीटर जमीन संपादन करण्याचा प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दिला होता. ती जमीन अनंत शेणवी धुमे या नागरिकाची होती. हा प्रस्ताव सात दिवसांच्या आत मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला होता. आज तीच जमीन १ /१४च्या उताऱ्यात मडकईकर रियल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीची असल्याचे दाखविण्यात येत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जी जमीन आमदार आपण स्वत:हून मुख्यमंत्र्यांना एखाद्या सार्वजनिक प्रकल्पासाठी दाखवितात आणि कालांतराने ती मूळ मालकाकडून आपणच विकत घेतात, या प्रकारात भ्रष्टाचाराचा संशय येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणी भ्रष्टाचारविरोधी पथकाकडून चौकशी करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांनी हस्तक्षेप करून सरकारवरच टीका करताना, प्रकल्पासाठी राखून ठेवलेली जमीन १० वर्षे अधिसूचित का करण्यात आली नाही, असा प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी, तेव्हा आपले सरकार कोसळले होते. त्यानंतरच्या सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगून प्रतिहल्ला चढविला. हा मुद्दा मडकईकर यांनीच प्रश्नोत्तराच्या तासाला उपस्थित केला होता. (प्रतिनिधी)