शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

मडगाव, कुंकळ्ळी, काणकोण, पेडणेला आता महिला नगराध्यक्ष

By admin | Updated: July 15, 2015 01:44 IST

पणजी : सरकारच्या पालिका प्रशासन खात्याने पेडणे, मडगाव, काणकोण व कुंकळ्ळी या पालिकांचे नगराध्यक्षपद महिलांसाठी आरक्षित केले आहे.

पणजी : सरकारच्या पालिका प्रशासन खात्याने पेडणे, मडगाव, काणकोण व कुंकळ्ळी या पालिकांचे नगराध्यक्षपद महिलांसाठी आरक्षित केले आहे. सध्या साखळी, डिचोली, मुरगाव, कुडचडे आणि फोंडा या पालिकांचे नगराध्यक्षपद महिलांसाठी आरक्षित आहे. तथापि, आता आॅक्टोबरमध्ये निवडणुका पार पडल्यानंतर साखळी, डिचोली, मुरगाव व कुडचडे या पालिकांच्या नगराध्यक्षपदासाठी असलेले महिला आरक्षण रद्द होईल. त्याऐवजी फिरत्या पद्धतीने पेडणे, मडगाव, काणकोण व कुंकळ्ळी पालिकेच्या नगराध्यक्षपदी महिला नगरसेवक पाहायला मिळतील. तशी तरतूद पालिका प्रशासन खात्याने केली आहे. मामलेदारांमार्फत सध्या प्रभागांची फेररचना करून घेतली जात आहे. म्हणजे प्रत्येक प्रभागात समान मतदारसंख्या असावी असा प्रयत्न केला जात आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी पंचायत खात्याने भाजपच्या विरोधातील उमेदवारांची अडचण होईल, अशा पद्धतीने प्रभाग फेररचना व आरक्षण केले होते. तो मोठ्या वादाचा विषय ठरला होता. त्याच धर्तीवर सध्या पालिका प्रभागांची फेररचना काही ठिकाणी सुरू असल्याची चर्चा विरोधी पक्षाशी संबंधित विद्यमान नगरसेवकांमध्ये आहे. सरकारमधील काही मंत्री, आमदार आॅक्टोबरमधील निवडणुकांनंतरही पालिका आपल्या समर्थकांच्या हाती राहाव्यात म्हणून प्रयत्न करत आहेत. आॅगस्टपासून निवडणूक आयोग सक्रिय होणार आहे. (खास प्रतिनिधी)