शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

पर्रीकरांच्या वाढदिनासाठी लगबग

By admin | Updated: November 29, 2015 01:59 IST

पणजी : संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या वाढदिन सोहळ्याची जय्यत तयारी सध्या सरकार आणि भारतीय जनता पक्ष

पणजी : संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या वाढदिन सोहळ्याची जय्यत तयारी सध्या सरकार आणि भारतीय जनता पक्ष मिळून करत आहे. राज्यभर भाजपच्या बैठकांचा धडाका सुरू आहे. वाढदिन सोहळ्यानिमित्त भाजप कार्यकर्त्यांमधील मरगळ दूर होईल व त्यांच्यात नव्याने चैतन्य निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शनिवारी येथे व्यक्त केला. सत्कार समितीच्या आयोजन समितीची मुख्यमंत्र्यांनी शनिवारी बैठक घेऊन तयारी कुठवर पोहोचली आहे, याचा आढावा घेतला. आम्ही येत्या १३ डिसेंबर रोजी कांपाल येथे मोठी गर्दी जमवू. पर्रीकरांच्या वाढदिन सोहळ्यानिमित्त भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा चैतन्य निर्माण करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. गेल्या साडेतीन वर्षांच्या सत्ताकाळात जर संघटनात्मक पातळीवर कुठे मरगळ आलेली असेल, तर ती आता जाईल. सगळे पदाधिकारी व कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. प्रत्येक मतदारसंघात भाजपच्या बैठका सुरू आहेत. येत्या १३ रोजी गर्दी जमविण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले जात आहे. पर्रीकर हे वयाची ६0 वर्षे येत्या १३ रोजी पूर्ण करत असल्याने हा सत्कार आहे. पुढील वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असल्याने पर्रीकरांचा सत्कार सोहळा हा त्या दृष्टीनेही उपयुक्त ठरेल, असे पार्सेकर म्हणाले. दरम्यान, या सत्कार सोहळ्यावर सरकार खर्च करत नाही. १३५ सदस्यांची आयोजन समिती मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी नेमली आहे. त्या समितीवर भाजपच्या नेत्यांसह ‘मगो’चे मंत्री व सत्ताधारी आघाडीतील अन्य पक्षांचेही आमदार आहेत. तसेच दोन उद्योगपतीही आहेत. पर्रीकरांच्या सत्कारानिमित्त होणारी सभा ही एकप्रकारे पुढील विधानसभा निवडणुकीनिमित्त भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडणारीच ठरेल, असे जाणकारांचे मत आहे. (खास प्रतिनिधी)