शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

गोव्यातील प्रश्नांकडे ब्रिक्सने लक्ष द्यावे, 1 ऑक्टोबरपासून जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2016 20:44 IST

ब्रिक्स परिषदेचे लक्ष वेधण्यासाठी गोवा व गोव्याबाहेरील सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले आहेत.

ऑनलाइन लोकमत

पणजी, दि. 28 - गोव्यातील जनजीवनावर विविध प्रकारे होत असलेले परिणाम, येथील अनुसूचित जमातींची स्थिती, पर्यावरणाची हानी, पर्यटनातून येणारे दुष्परिणाम, सरकारच्या विकास मॉडेलचा मच्छीमारांवर होणारा परिणाम, महिलांमधील असुरक्षितता व अन्य तत्सम प्रश्नांकडे ब्रिक्स परिषदेचे लक्ष वेधण्यासाठी गोवा व गोव्याबाहेरील सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले आहेत. त्यांनी पिपल्स फोरम ऑन ब्रिक्स ही संस्था स्थापन केली आहे.आल्बेर्टिना आल्मेदा, सॅबिना मार्टीन्स आदी फोरमच्या पदाधिका-यांनी मिळून बुधवारी येथे पत्रकार परिषद घेतली. येत्या महिन्यात गोव्यात होत असलेल्या ब्रिक्स परिषदेत अनेक देशांचे प्रमुख सहभागी होतील. ते आंतरराष्ट्रीय विषयांबाबत चर्चा करतील पण त्यांना गोव्यातीलही स्थिती कळावी म्हणून ब्रिक्सपूर्व विविध कृतीसत्रंचे आयोजन पिपल्स फोरम ऑन ब्रिक्सतर्फे करण्यात आले असल्याचे आल्मेदा यांनी सांगितले.गोव्यातील जमाती, त्यांची स्थिती व अन्य जातींतील लोकांना मिळणारी वागणूक, पक्षपात व अन्य विषयांवर प्रकाश टाकणा:या छायाचित्रंचे प्रदर्शन 1 ऑक्टोबर रोजी येथील टी. बी. कुन्हा सभागृहात दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेळेत होणार आहे. गोव्याचे आधुनिकीकरण होत असताना अनुसूचित जमातीतील लोकांचाही विचार व्हावा असे अपेक्षित आहे, असे आल्मेदा म्हणाल्या.पर्यटनाचे खासगीकरण या विषयावर 3 रोजी दुपारी अडीच ते पाच या वेळेत कारिटास हॉलिडे होमच्या सभागृहात चर्चासत्र होईल. लोकांच्या जीवनावरील अर्निबध पर्यटनाचा परिणाम, अपुरी संसाधने अशा विषयांवर प्रकाश टाकला जाईल. 7 ऑक्टोबर रोजी मायनिंग, मोपा विमानतळासारखे मेगा प्रकल्प व अन्य विषयांशीनिगडीत पिपल्स रिसोर्सिस, पिपल्स अ‍ॅसर्शन हा परिसंवाद होईल. 12 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता गोवा बँक कर्मचारी संघटनेचा परिसंवाद होईल. 12 रोजी ब्रिक्स परिषदेसाठी महिलांचा अजेंडा या विषयावर चर्चा होईल. बायलांचो सादतर्फे या परिसंवादाचे आयोजन केले जाईल. महिलांवर होत असलेले अन्याय, अत्याचार याविषयी त्यात चर्चा अपेक्षित आहे.