शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मराठी शाळांसाठी अखेर २७४ शिक्षकांची नियुक्ती

By admin | Updated: July 8, 2015 01:43 IST

मराठी माध्यमाच्या सरकारी प्राथमिक शाळांमध्ये इंग्रजी विषय शिकविण्यासाठी राज्य सरकारने रद्दबातल ठरलेली शिक्षकांची सर्व पदे पुनरुज्जीवित करून मंगळवारी २७४

सद्गुरू पाटील ल्ल पणजीमराठी माध्यमाच्या सरकारी प्राथमिक शाळांमध्ये इंग्रजी विषय शिकविण्यासाठी राज्य सरकारने रद्दबातल ठरलेली शिक्षकांची सर्व पदे पुनरुज्जीवित करून मंगळवारी २७४ शिक्षकांची कायमस्वरूपी नियुक्ती केली. त्यामुळे या शिक्षकांची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यासंदर्भात ‘लोकमत’ने गेल्या महिन्यात दिलेले वृत्त खरे ठरले.हे सर्व इंग्रजी शिक्षक सरकारी मराठी शाळांमध्ये इंग्रजी विषय शिकवणार आहेत. पर्रीकर सरकार अधिकारावर असताना दोन वर्षांपूर्वी राज्यातील मराठी शाळांमध्ये इंग्रजी शिक्षक नेमण्याचा निर्णय झाला होता. त्या वेळी शिक्षणाच्या माध्यमाचा वाद गाजत होता. डायोसेझनच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांना सरकारने अनुदान दिले, तर राज्यातील मराठी व कोकणी माध्यमाच्या शाळा अडचणीत येतील, अशी भीती सर्वत्र व्यक्त होत होती. मराठी शाळांमध्ये मुलांना इंग्रजी शिकविले जात नाही. त्यामुळे त्या शाळांमध्ये मुलांना न पाठविता पालक मुलांना इंग्रजी शाळांमध्ये पाठवितात, असाही मुद्दा मांडला जात होता. यावर उपाय म्हणून दोन वर्षांपूर्वी सरकारने इंग्रजी शिक्षक नेमण्याचे ठरविले. तथापि, गेल्या दोन वर्षांत नियुक्ती न झाल्याने पदे रद्दबातल ठरली. त्या वेळी जे उमेदवार या पदांसाठी आले होते, त्याच उमेदवारांपैकी २७४ उमेदवार आता निवडले गेले. गेल्याच महिन्यात प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली होती. ‘लोकमत’ने त्या वेळी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याशी संपर्क साधून वृत्त दिले. काही अधिकाऱ्यांनी त्या वेळी अजून २७४ शिक्षकांची निवड झालेलीच नाही, अशी लपवाछपवीही केली होती.