शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
3
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
4
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
5
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
6
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
7
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
8
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
9
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
10
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
11
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
12
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
13
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
14
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
15
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
16
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
17
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
18
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
19
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
20
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट

ईशा मृत्यू प्रकरणी न्यायालयीन

By admin | Updated: January 3, 2015 01:34 IST

पणजी : नृत्य महोत्सवात (सुपरसॉनिक पार्टी) बळी पडलेल्या ईशा मंत्री प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी केली.

पणजी : नृत्य महोत्सवात (सुपरसॉनिक पार्टी) बळी पडलेल्या ईशा मंत्री प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी केली. पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणी पोलीस सरकारच्या दबावाखाली वावरत असल्याचा आरोप केला. ईशा हिचा मृत्यू पार्टीस्थळी नव्हे, तर पार्टी संपल्यानंतर झाला, असा दावा पोलीस करीत आहेत. पर्यटनमंत्र्यांनीही असाच दावा आधी केला होता. ईशाचा मृत्यू अतिमद्यप्राशनाने झाल्याचे मंत्री म्हणतात, याचाच अर्थ पोलिसांनीही हीच भूमिका घ्यावी, असे त्यांना वाटते आणि पोलीसही त्यांचीच री ओढत असल्याचा आरोप डिमेलो यांनी केला. ईशाचा मृत्यू पार्टीत झाला असताना अजून आयोजकांची चौकशी का होत नाही. पार्टीस्थळावरील सीसीटीव्ही कॅमेरे अजून जप्त का केलेले नाहीत, असे प्रश्न त्यांनी विचारले. सरकार हे प्रकरण दडपून टाकू पाहत आहे, असे ते म्हणाले. ईशाचा मृत्यू पार्टी चालू असताना तेथे कोसळूनच झाला आणि आयोजकांनी संगीत थांबविण्याचे साधे सौजन्यही दाखवले नाही, असे जे व्टिट निर्माता महेश भट्ट यांनी केले, त्याचाही उल्लेख केला. तिचा मृत्यू पार्टीच्या ठिकाणी झाला नसल्याचा जो दावा सरकारकडून केला जातो, तो खोटा असल्याचे ते म्हणाले. स्थानिक आमदार नेहमी किनारी भागात ड्रग्स व्यवसाय चालतो, असे विधानसभेत निदर्शनास आणतात; परंतु वरील प्रकरणानंतर सुपरसॉनिक पार्टीत ड्रग्सचा वापर झालाच नाही, असा जो निर्वाळा त्यांनी दिलेला आहे, त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसल्याचे डिमेलो म्हणाले. पत्रकार परिषदेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नीळकंठ हळर्णकरही उपस्थित होते. (प्रतिनिधी)