शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बाल कल्याण समितीस चौकशीची सूचना

By admin | Updated: September 3, 2014 01:14 IST

पणजी : उत्तर गोव्यातील एका लंडनस्थित चॅरिटी होममध्ये पंधरा वर्षीय मुलीवर बलात्कार झाला असून त्यात ही मुलगी गर्भवती राहिली असल्याचे प्रकरण उघड झाले आहे.

पणजी : उत्तर गोव्यातील एका लंडनस्थित चॅरिटी होममध्ये पंधरा वर्षीय मुलीवर बलात्कार झाला असून त्यात ही मुलगी गर्भवती राहिली असल्याचे प्रकरण उघड झाले आहे. प्रसारमाध्यमांमधून प्रकरण उजेडात येताच सरकारने या प्रकरणाची दखल घेतली असून उत्तर गोवा बाल कल्याण समिती आणि पोलिसांनाही या प्रकरणी चौकशी करण्यास सांगण्याचे ठरले आहे. उत्तर गोव्यातील चॅरिटी होममध्ये बलात्कार झाल्यानंतर ती मुलगी दहा दिवसांची गर्भवती राहिली. चॅरिटी होमच्या कर्मचाऱ्यावरच बलात्काराचा आरोप आहे. गेल्या एप्रिलमध्ये त्यास जुनेगोवे पोलिसांनी अटक केली व लगेच सोडून दिले. एका लंडनस्थित जोडप्याकडून हे चॅरिटी होम चालविले जात होते. त्या जोडप्याने चॅरिटी होम बंद करून पळ काढला आहे. त्या जोडप्याचा व त्या होममध्ये राहणाऱ्या पंचवीस-तीस मुलांचाही पत्ता नाही. यापूर्वी त्या जोडप्यावरही काहीच कारवाई झाली नाही किंवा त्यांचा शोध घेण्याचाही प्रयत्न झाला नाही. पोलिसांनी हे प्रकरण अगदी सहजपणे घेतले. यावर प्रसारमाध्यमांनी प्रकाश टाकल्यानंतर आता राज्य सरकारच्या यंत्रणेने या विषयाची दखल घेतली आहे. उत्तर गोवा व दक्षिण गोवा अशा दोन जिल्ह्यांसाठी दोन बाल कल्याण समित्या कार्यरत आहेत. उत्तर गोवा बाल कल्याण समितीने व पोलिसांनी या एकूण प्रकरणाची सखोल चौकशी करावी व अहवाल द्यावा, असे पत्र समितीला व पोलिसांना आता पाठविले जाणार आहे. महिला व बाल कल्याण खात्याचे सचिव पी. कृष्णमूर्ती यांनी तशी भूमिका घेतली आहे. ‘स्कॅन’ या निमसरकारी संस्थेने प्रथम हा विषय पोलिसांपर्यंत पोहचविला. त्यानंतर पोलिसांनी बलात्कार प्रकरणी मुलीच्या आईकडून तक्रार घेतली. जुनेगोवे पोलिसांनी गेल्या १५ एप्रिल रोजी एफआयआर नोंदवला. (खास प्रतिनिधी)