शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

माध्यान्ह आहारास पावाच्या महागाईचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2016 02:50 IST

पणजी : राज्यात ७० ग्रॅम पावाचा दर येत्या दि. १ जुलैपासून ५ रुपये होत असल्याने शिक्षण खात्याच्या माध्यान्ह आहार योजनेचे

पणजी : राज्यात ७० ग्रॅम पावाचा दर येत्या दि. १ जुलैपासून ५ रुपये होत असल्याने शिक्षण खात्याच्या माध्यान्ह आहार योजनेचे गणित कोलमडल्यात जमा आहे. केवळ ५ रुपये ७० पैशांत विद्यार्थ्यांना भाजी-पाव देणारे शिक्षण खाते आता पावाच्या पाच रुपये किमतीवर कसा तोडगा काढणार, असा प्रश्न महिला मंडळे व स्वयंसाहाय्य गटांना पडला आहे. माध्यान्ह आहाराची कंत्राटे देऊन आहाराचा रोज लाखो विद्यार्थ्यांना पुरवठा करणाऱ्या शिक्षण खात्याकडून पाच-सहा महिने कंत्राटदार गटांची बिलेच दिली गेलेली नाहीत. रोज विद्यार्थ्यांना पाव-भाजी द्यावी लागते. शिक्षण खाते गहू देत असले, तरी त्या गव्हाचा दर्जा खूपच हलका असतो. त्यामुळे चपात्या करण्यासाठी स्वयंसाहाय्य गट या गव्हाचा वापर करत नाहीत. त्याऐवजी मुलांना पावाचाच पुरवठा करतात. पावाची किंमत कमी होती, तोपर्यंत हे परवडत होते; पण आता मोठ्या पावाचीच किंमत ५ रुपये झाल्यामुळे आम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला भाजी-पाव ५ रुपये ७० पैशांनी देणे कसे परवडेल, असा प्रश्न महिला मंडळे करू लागली आहेत. सहाही दिवस रोज वेगवेगळ्या प्रकारची भाजी द्यावी लागते. केवळ वाटाण्याचीच भाजी देऊन चालत नाही. काबुली चणे, मसूर वगैरे कडधान्ये प्रचंड महागली आहेत. वाटाण्याचीही किंमत खूपच वाढली आहे. तशात आता पाव पाच रुपये झाल्यामुळे अनेक स्वयंसाहाय्य गटांनी आम्हाला माध्यान्ह आहाराचे कंत्राटच नको, असे शिक्षण खात्याला कळविण्याचे ठरविले आहे. यापूर्वी उत्तर गोव्यात काहीजणांनी कंत्राटाची मालकी सोडून दिली आहे. काहीजणांना शिक्षण खात्याने आता अर्ध्यावर सोडू नका, तुम्हाला दीड लाखाचा दंड ठोठवू, असेही कळविले असल्याची माहिती मिळते. काही महिला मंडळे व स्वयंसाहाय्य गट हे भाजपला, तर काही गट काँग्रेसला जवळचे आहेत. (खास प्रतिनिधी)