शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

अर्भक मृत्यूचे प्रमाण घटले

By admin | Updated: March 11, 2015 03:15 IST

पणजी : राज्यात २००७ सालापासून आरोग्य खात्याच्या स्तरावरून सुरू झालेल्या प्रयत्नांचे फळ म्हणून आता अर्भक मृत्यूचे प्रमाण

पणजी : राज्यात २००७ सालापासून आरोग्य खात्याच्या स्तरावरून सुरू झालेल्या प्रयत्नांचे फळ म्हणून आता अर्भक मृत्यूचे प्रमाण बरेच घटले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याची दखल घेऊन गोव्याला ११२ कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी दिला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये अर्भक मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. गोव्यात मात्र आता १ हजारामागे ९ असे प्रमाण झाले आहे. काही वर्षांपूर्वी हे प्रमाण हजारामागे १0 असे होते. म्हणजे एक हजार महिलांची प्रसुती झाली, तर त्यातील दहा अर्भकांचा बळी जात होता. याबाबत उपाययोजना करण्याची प्रक्रिया गेल्या २००७ सालापासून सुरू झाली व त्यामुळे आता अर्भक मृत्यूचे प्रमाण हजारामागे नऊ झाले आहे, असे उपमुख्यमंत्री अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोझा यांनी सांगितले. दरम्यान, बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात हृदयरोगविषयक सुपरस्पेशालिटीची सुविधा सुरू झाल्यानंतर आता वर्षभरात २१०० व्यक्तींवर हृदयरोगविषयक उपचार करण्यात आले. यात अँजीओग्राफी व अँजीओप्लास्टीचा समावेश आहे. २१०० पैकी केवळ एकच व्यक्ती उपचारानंतर दगावली. उर्वरित सगळे ठिक आहेत, असे उपमुख्यमंत्री डिसोझा यांनी सांगितले. राज्यात स्वाईन फ्लू नियंत्रणात आहे. आतापर्यंत ६९ व्यक्तींच्या थुंकीचे नमुने दिल्लीला पाठविण्यात आले. त्या सर्वांचे अहवाल आले. प्रत्येक चाचणीसाठी सरकारला ४ हजार ५०३ रुपयांचा खर्च करावा लागला. दिल्लीहून अहवाल येण्यास विलंब लागतो. यापुढे आम्ही कर्नाटकमधील मणिपालमध्ये नमुने पाठवू. तिथे एका चाचणीसाठी साडेचारशे रुपयांचा खर्च येईल, असे डिसोझा यांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)