शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

अपक्ष आमदारांचा विद्यार्थ्यांना पाठिंबा

By admin | Updated: November 24, 2015 01:30 IST

पणजी : एफटीआयआयच्या आंदोलक विद्यार्थ्यांना अपक्ष आमदार विजय सरदेसाई, रोहन खंवटे व नरेश सावळ यांनी पाठिंबा

पणजी : एफटीआयआयच्या आंदोलक विद्यार्थ्यांना अपक्ष आमदार विजय सरदेसाई, रोहन खंवटे व नरेश सावळ यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. या विद्यार्थ्यांनी येथील पिएदाद इन्स्टिट्यूट सभागृहात आयोजिलेल्या समांतर चित्रपट महोत्सवास सरकारने पोलिसी बळाचा वापर करून किंवा अन्य कोणत्याही प्रकारे अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्यास मतदारसंघातील लोकांना घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशाराही या तिन्ही आमदारांनी दिला. तिन्ही अपक्ष आमदारांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर केली. आघाडीचे चित्रकार सुबोध केरकर यांनीही विद्यार्थ्यांना समर्थन दिले आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी या विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार नसल्याचे जे विधान केले आहे त्याचा आमदार सरदेसाई यांनी निषेध केला. ते म्हणाले की, राज्यात आणीबाणीसदृश स्थिती आहे. एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना इफ्फीस्थळी जी वागणूक दिली जात आहे ती पाहता हुकूमशाहीच चालल्याचे दिसते. केंद्रात भाजपने मर्जीतील लोकांची नियुक्ती करून एफटीआयआय संस्थाच हायजॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. या संस्थेच्या संचालकपदी नेमलेली व्यक्ती त्या पदास पात्र नाही आणि त्याविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा छळ केला जात आहे. राज्य सरकार इफ्फीचे आयोजन करते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सरदेसाई यांनी असाही आरोप केला की, पोलिसांचे दंडेलशाही इफ्फीच्या ठिकाणीच नव्हे, तर इतरत्रही घडत आहे. फा. बिस्मार्क यांना न्याय मिळावा या मागणीसाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी हात टाकला. गोव्याचे नाव यामुळे खराब होत आहे. आमदार रोहन खंवटे यांनीही राज्यात हुकूमशाही चालू असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला निषेध करण्याचा अधिकार आहे. भाजप विरोधात असताना त्यांचे आमदार मनाविरोधात काही झाले तर रस्ते अडवायचे. आता इतरांनी ते केले तर सत्ताधाऱ्यांना आवडत नाही. केवळ एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचाच छळ चालला आहे, असे नव्हे तर अन्य बाबतीतही असेच घडत आहे. फा. बिस्मार्क प्रकरणात आंदोलकांना पोलिसांनी ज्या पद्धतीने हाताळले ते चुकीचे आहे. आघाडीचे चित्रकार सुबोध केरकर यांनीही या विद्यार्थ्यांना पाठिंबा देताना एफटीआयआयसारख्या प्रतिष्ठेच्या संस्थेशी भाजप सरकारने खेळ मांडल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, कला कोणतीही असो ती बहरावी, या क्षेत्रात अधिकाधिक लोकांना वाव मिळावा यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. पात्र नसलेल्या व्यक्तीला संस्थेच्या प्रमुख पदावर बसविणे अन्यायकारक आहे. ते खपवून घेता कामा नये. अपक्ष आमदार नरेश सावळही या वेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)