पणजी : २00८ साली एका घोटाळ्यात अटक झालेला आयकर अधिकारी आशुतोष वर्मा याची मोरजी किनाऱ्यावरील जमीन बेनामी मालमत्ता म्हणून मनी लाँडरिंगविरोधी खास न्यायालयाने जप्त केली असल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. आशुतोष याला शस्त्रास्त्र दलाल सुरेश नंदा याच्या कंपनीला आयकरात सवलत दिल्याप्रकरणी अटक झाली होती. २0१२ पासून हे प्रकरण सक्तवसुली संचालनालयाकडे आहे. आशुतोष हा सध्या चेन्नई येथे संयुक्त आयकर आयुक्त आहे. २00८ साली सीबीआयने आशुतोष व सुरेश नंदा यांना मुंबईत अटक केली होती. मोरजीतील जागा ४ कोटी ४0 लाखाला खरेदी केली होती. या जमिनीचा मूळ मालक आशुतोष हाच असून वेगळ्या नावाने त्याने ही जमीन खरेदी केल्याचे चौकशी यंत्रणांचे म्हणणे आहे, तर आशुतोष याने हे आरोप फेटाळून लावले आहेत. (प्रतिनिधी)
आयकर अधिकाऱ्याची बेनामी मालमत्ता जप्त
By admin | Updated: June 16, 2014 02:00 IST