शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

हरमल किनाऱ्यावर बेकायदा व्यवसाय

By admin | Updated: March 9, 2015 22:41 IST

कोरगाव : हरमल किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात लमाणी लोकांनी हैदोस घातला असून अंदाजे ५०० हून अधिक लमाणी लोक या समुद्रकिनाऱ्यावर कपडे,

कोरगाव : हरमल किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात लमाणी लोकांनी हैदोस घातला असून अंदाजे ५०० हून अधिक लमाणी लोक या समुद्रकिनाऱ्यावर कपडे, खोट्या सोन्याचे दागिने विकण्याचा व्यवसाय करीत आहेत. या व्यवसायाआडून अन्य प्रकारचे बेकायदेशीर प्रकार या ठिकाणी खुलेआम चालू असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. समुद्रकिनाऱ्यापासूनच ५० मीटरवर हरमल पोलीस आउट पोस्ट आहे. येथे चाललेले सर्व प्रकार या आउट पोस्टच्या नजरेतून सुटणे शक्यच नाही, किंबहुना त्यांच्याच आशीर्वादाने या ठिकाणी लमाणी लोकांचे व्यवहार चालू आहेत. गेल्या वर्षी या लमाणी लोकांकडून पोलिसांना महिन्याकाठी ७० ते ९० हजारांचा हप्ता मिळत असल्याची चर्चा होती. या वर्षी हा आकडा वर चढल्याचे सांगितले जाते. पर्यटन हंगाम संपत आला तरी येथील पोलिसांनी एकाही लमाण्याच्या विरोधात कारवाई केल्याचे उदाहरण नाही. अनेकवेळा स्थानिक लोकांनी हरमल आउट पोस्टचे प्रमुख साळगावकर, त्यांचे वरिष्ठ चोडणकर यांना वेळोवेळी सांगूनही काहीच कारवाई झालेली नाही. याचा अर्थच या ठिकाणी लमाणी विक्रेत्यांना सगळे काही माफ आहे, असा स्थानिक लावतात . भरदिवसा हे लमाणी लोक विदेशी पर्यटकांना, त्यांच्या बाजूला बसून आपले कपडे विकण्याचा प्रयत्न करतात. हे केवळ निमित्त. अनेकदा या कपड्यांच्या आत काय लपले आहे हे लमाणी आणि पर्यटकांबरोबर येथील पोलिसांनासुद्धा ज्ञात आहे. या लमाणी लोकांकडे सर्रास तीन पिशव्या असतात. एकीत कपडे सामान, दुसरीत बांगड्या व अन्य वस्तू. मात्र, तिसऱ्या पिशवीत काय असते हे गुपित अजूनही कोणालाच कळलेले नाही. हरमल आउट पोस्टवर अनेक प्रकरणे येत असतात. त्यातील ९० टक्के प्रकरणे मध्यस्थी करून सोडविली जातात. या मध्यस्थीमुळे या भागात सर्वांचाच ‘विजय’ होत असल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी अशा अधिकाऱ्यांची कानउघाडणी करून मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांना योग्य ती कडक कारवाई करण्याची मागणी येथील लोक करीत आहेत. समुद्रकिनाऱ्यावर अनेक कायदेशीर बाबी पूर्ण करून काही दुकानवाले आपली दुकाने थाटतात. दुसऱ्या बाजूने पोलिसांच्या सहकार्याने लमाणी लोक खुल्लम खुल्ला व्यवसाय करून या सनदशीर व्यवसायाला तोट्यात आणतात. अशा लोकांना सांभाळून घेणाऱ्या पोलिसांना ताकीद मिळावी, अशी मागणी या भागातील लोकांनी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडे केली आहे. (वार्ताहर)