शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
5
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
6
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
7
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
8
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
9
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
10
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
11
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
12
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
13
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
14
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
15
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
16
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
17
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
18
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
19
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
20
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!

इफ्फीचा आज समारोप; ए. आर. रेहमान यांची उपस्थिती

By admin | Updated: November 30, 2015 02:01 IST

पणजी : येथे गेले दहा दिवस सुरू असलेल्या ४६व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सोमवारी सांगता होणार

पणजी : येथे गेले दहा दिवस सुरू असलेल्या ४६व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सोमवारी सांगता होणार आहे. दोनापावल येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात सांयकाळी ४.३0 वाजता समारोप कार्यक्रम सुरू होईल. मुख्य अतिथी म्हणून प्रख्यात संगीतकार ए. आर. रेहमान उपस्थित असतील. या वेळी भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास नृत्याद्वारे मांडला जाणार आहे. समारोपानंतर कला अकादमी व आयनॉक्समध्ये अलेजेंड्रो कारिलो परिनी यांच्या ‘द क्लेन’ चित्रपटाचा खेळ होईल. अंदाजे सहा हजार प्रतिनिधी गोव्याबाहेरून खास चित्रपट पाहण्यासाठी येथे आले होते. तसेच बॉलीवूड, हॉलीवूड, दक्षिणेतील आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माता, संगीतकार यांनी रसिकांशी संवाद साधला. बक्षीस वितरण सोहळ्यात सुवर्ण मयूर, रजत मयूर, शांती पुरस्कार, उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री असे अनेक पुरस्कारही जाहीर होणार आहेत. ‘जीवनगौरव’ पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक निकिता मिखालकोव्ह यांनी प्रदान केला जाईल. त्यांची पत्नीही या वेळी उपस्थित असेल. यंदाचे ज्युरी अभिनेते-दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याबरोबर ज्युरी टीम रविवारी गोव्यात उपस्थित होती. तसेच संगीतकार रसुल पुकुट्टी, कला दिग्दर्शक साबू सिरील, केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धनसिंग राठोड, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, गोवा मनोरंजन संस्थेचे कार्यकारी अधिकारी अमेय अभ्यंकर, संस्थेचे अध्यक्ष दामू नाईक आदी मान्यवरही या वेळी उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)