शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
2
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
3
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
4
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
5
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
8
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
9
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
10
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
11
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
14
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
15
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
16
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
17
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
18
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
19
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
20
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार

हॉट एअर बलुन्स एप्रिलमध्ये

By admin | Updated: January 7, 2015 01:27 IST

पणजी : येत्या एप्रिलमध्ये राज्यात हॉट एअर बलुन्स व अ‍ॅम्फीबियस व्हेईकल्स (पाण्यावर व जमिनीवर चालणारी वाहने) हे प्रकल्प सुरू केले जाणार आहेत.

पणजी : येत्या एप्रिलमध्ये राज्यात हॉट एअर बलुन्स व अ‍ॅम्फीबियस व्हेईकल्स (पाण्यावर व जमिनीवर चालणारी वाहने) हे प्रकल्प सुरू केले जाणार आहेत. पर्यटन खाते व गोवा पर्यटन विकास महामंडळाने तसा निर्णय घेतला असून या कामासाठी दोन कंपन्यांचीही निवड केली आहे. दिल्ली येथील कॅम्पलिंग रिट्रिट्स प्रा. लिमिटेड कंपनीकडून हॉट एअर बलुन्स, तर गोव्यातील डिसोझा लिशर प्रा. लिमिटेड कंपनीकडून अ‍ॅम्फीबियस व्हेईकल्स प्रकल्प चालविला जाणार आहे. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना पर्यटनाचा अधिक थरारक; पण आनंददायी असा अनुभव यावा म्हणून हे दोन प्रकल्प सुरू करण्याचे ठरले आहे. गोव्यातील फेरीबोट धक्क्यांवरून सहा अ‍ॅम्फीबियस वाहने सोडली जातील. जमीन व पाणी अशा दोन्ही ठिकाणी ही वाहने चालू शकतील. गोव्यातील जलमार्गांवर ‘हॉप आॅन हॉप आॅफ’ सफरींचे आयोजन केले जाणार आहे. अर्धा तास ते एक तास सफरीवेळी ३४ प्रवाशांना वाहनात स्थान दिले जाईल. पाण्यावर व रस्त्यावरही चालू शकतील, अशी वाहने गोव्यातील एसीजीएलच्या सहकार्याने तयार केली जाणार आहेत. गोव्यात यामुळे इको-टुरिझमही वाढीस लागेल. हॉट एअर बलुन्स प्रकल्प दूधसागर परिसरात राबविला जाईल. या प्रकल्पांतर्गत प्रारंभी दोन बलुन्स वापरले जातील. या दोन्ही प्रकल्पांमध्ये गोवा पर्यटन विकास महामंडळ गुंतवणूक करणार नाही. महामंडळाला वार्षिक सुमारे ६0 लाख रुपयांचा महसूल मिळेल, असे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निखिल देसाई यांनी म्हटले आहे. (खास प्रतिनिधी)