शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाने झोडपले

By admin | Updated: July 2, 2015 01:33 IST

पणजी : संततधार पावसाने बुधवारी गोव्याला झोडपून काढले. दिवसभरात राजधानी पणजीत दीड इंच पावसाची नोंद झाली. अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये

पणजी : संततधार पावसाने बुधवारी गोव्याला झोडपून काढले. दिवसभरात राजधानी पणजीत दीड इंच पावसाची नोंद झाली. अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचून राहण्याचे प्रकार घडले. पावसामुळे वाहतूक कोंडी झाली. आगामी चार दिवस पावसाचा जोर राहील. पुढील २४ तासांतही मुसळधार पावसाची शक्यता हवामान वेधशाळेने व्यक्त केली आहे. गेले काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाने मंगळवारी रात्रीपासून संततधार चालू होती. त्यानंतर बुधवार सकाळी एक ते दोन तास विश्रांती घेऊन पुन्हा जोर धरला. दुपारी शाळा सुटण्याच्यावेळीच मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचे अक्षरश: हाल झाले. बुधवारी सकाळी ८.३0 वाजेपर्यंत २४ तासांत राज्यात सरासरी दीड इंच पाऊस झाला. या २४ तासांच्या कालावधीत केपेत सर्वाधिक २.९१ इंच पाऊस झाला. साखळीत एकू ण मोसमी पाऊस ४0 इंचांवर पोहोचला आहे. जूनमध्ये सरासरीपेक्षा १३ टक्के कमी पाऊस झालेला आहे. सरासरी ९११.६ मि. मि. पाऊस अपेक्षित होता; परंतु ७९३.७ मि.मि. पावसाची नोंद झाली.आल्तिनो येथील हवामान वेधशाळेच्या संचालिका व्ही. के. मिनी यांना विचारले असता, मान्सूनच दुसरा टप्पा सक्रिय झाला असून पुढील चार दिवस पावसाचा जोर राहील, असे त्यांनी सांगितले. गुजरात किनारपट्टीपासून केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मान्सून पुन्हा सक्रिय झालेला आहे. राजधानी पणजीत आंबेडकर उद्यानाजवळ रस्त्यावर पाणी आल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागली. अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता दिवसभरात आठ कॉल्स आल्याचे सांगण्यात आले. कोंब, मडगाव येथे घराला आग लागून सुमारे साडेतीन लाख रुपयांची हानी झाली. सकाळी ११.१५ च्या सुमारास ही घटना घडली. (प्रतिनिधी)